Home मनोरंजन ‘प्रीत अधुरी’  चित्रपट आज प्रदर्शित!

‘प्रीत अधुरी’  चित्रपट आज प्रदर्शित!

0 second read
0
0
301

no images were found

प्रीत अधुरी‘  चित्रपट आज प्रदर्शित!

कोल्हापूर :  एक हटके कथा घेऊन नवीन चित्रपट येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘प्रीत अधुरी’! खरेतर चित्रपटाच्या नावावरून असं वाटू शकतं की हा एखाद्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहे. त्यात तसं काही वावगंदेखील नाही. पण कथेतील नायक आणि नायिकेच्या प्रेमकथेसोबतच या चित्रपटात उलगडत जाणार आहे एक सस्पेन्स! हा सस्पेन्स कुठल्या क्राईम स्टोरीचा नसला तरी त्याच अधिरतेनं प्रेक्षकांना थिएटर्समध्ये खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुई वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, वेगळा विषय आणि त्याची अतिशय साजेशी अशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक संपूर्ण अनुभूती देणारा ठरेल, हे मात्र नक्की!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…