no images were found
‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळ्यात रजनीश दुग्गलचे मंत्रमुग्ध करणारे नृत्य
यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका आणि चाकोरी मोडणारे रिअॅलिटी कार्यक्रम सादर केल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या मनोरंजक मालिका पोहोचविण्यासाठी अथक मेहनत करणारे, कलाकार, पटकथालेखक, निर्माते-दिग्दर्शक, तंत्रज्ञ, क्रिएटिव्ह टीम्स वगैरेंच्या कष्टाची दखल घेणार््या ‘झी रिश्ते पुरस्कार सोहळ्या’ची वेळ आली आहे. यंदाही हा पुरस्कार सोहळा नेहमीच्याच उत्साहाने साजरा केला जाणार आहे. यंदाचा ‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळा हा मोठा नेत्रदीपक कार्यक्रम ठरणार असून त्यात मालिकांतील अनेक व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांशी जोडल्या गेलेल्या नात्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा सोहळा म्हणजे प्रचंड मोठा उत्सव असून त्यात सर्वांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम असतील. ‘झी टीव्ही’ यंदा आपल्या प्रसारणाची 30 गौरवशाली वर्षे साजरी करणार असल्याने यंदाचे वर्ष हे ‘झी’साठी एक संस्मरणीय वर्ष ठरणार आहे. त्यानिमित्त ‘झी टीव्ही’ वाहिनीने यंदा आजवरचा सर्वात भव्य ‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळा आयोजित केला आहे. तो लवकरच या वाहिनीवरून प्रसारित केला जाईल.
‘झी टीव्ही’ वाहिनीने यंदाच्या ‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळ्याचा प्रारंभ ‘नाच, गाना, हंगामा आणि गेम्स नाइट’ या धमाल भागाने केला आणि ही रजनी तारे-तारकांनी फुलून गेली होती. ‘भाग्यलक्ष्मी’तील ऋषी (रोहित सुचांती) आणि आयुष (अमन गांधी), ‘मीत’मधील मीत हूडा (आशी सिंह) आणि अनुभा (वैष्णवी), ‘कुमकुम भाग्य’मधील पल्लवी (ख्याती केसवानी) आणि शहाना (अपर्णा मिश्रा), ‘कुंडली भाग्य’मधील सृष्टी (अंजुम फकीह) आणि समीर (अभिषेक कपूर), ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील राधा (निहारिका रॉय) आणि कावेरी (मनिषा पुरोहित) तसेच ‘संजोग’मधील राजीव (रजनीश दुग्गल) आणि अमृता (शेफाली शर्मा) यासारखे झी कुटुंबातील अनेक तारे-तारका या भागात सहभागी झाले होते. यात कलाकारांनी काही धमाल मनोरंजक खेळ खेळले, तरी ‘संजोग’मधील राजीव ऊर्फ रजनीश दुग्गल याने मलायका अरोराच्या ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यावर केलेले धमाल नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. रजनीश दुग्गलने आपल्या सळसळत्या पदन्यासाने हा कार्यक्रम जिंकला. या गाण्याच्या उडत्या चालीवर त्याला नाचताना पाहून कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जय भानुशाली यालाही राहावले नाही आणि त्यानेही रजनीशला या नृत्यात साथ दिली.
रजनीशचे हे सळसळते नृत्य तुम्हाला निश्चितच मंत्रमुग्ध करील, पण अन्य लोकप्रिय कलाकारांनीही तितकीच उत्तम कामगिरी करून दाखविली आहे, ते पाहा. ‘झी टीव्ही’वर 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9.00 वाजता ‘झी रिश्ते पुरस्कार नामांकन पार्टी’चे प्रसारण होईल.