no images were found
कृष्णाच्या गोष्टी ऐकून नेहमीच प्रेरित झाले– नेहा सरगम
माँ और लल्ला की कहानी है अद्भुत! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील यशोमती मैय्या के नंदलाला या आई आणि तिच्या मुलाच्या सुंदर नात्याचे चित्रण करणार्या मालिकेत सध्या बाल कृष्णाच्या खोड्या, लोण्याची चोरी वगैरे कृष्ण लीला दाखवल्या जात आहेत. आगामी आठवड्यात, प्रेक्षक बघतील की, नटखट कान्हा कशा प्रकारे गोपींकडून लोण्याची चोरी करण्याचे चालू ठेवतो. आता गोपी सावध झाल्या आहेत आणि त्या कृष्णाला हातोहात पकडण्यासाठी एक युक्ती योजतात, जेणे करून मैया यशोदेकडे त्यांना त्यांची बाजू खरी असल्याचे मांडता येईल.दुसरीकडे, कृष्णाला माती खाताना बघून बाळराम यशोदेकडे त्याची तक्रार करतो. चिंता वाटून यशोदा त्याला त्याचे तोंड उघडायला सांगते. कृष्णाच्या मुखात विश्वरूप दर्शन होऊन तिला मूर्छा येते. पुढे काय होणार?
मैया यशोदेची भूमिका करत असलेली नेहा सरगम म्हणते, लहान असताना मी जेव्हा कृष्णाच्या मुखात यशोदेला बह्मांड दर्शन झाल्याची कथा ऐकली, तेव्हा याविषयी आणखी जाणून घेण्याची उत्सुकता मला लागली होती. मी माझ्या आईला कृष्णाच्या जीवनातील विविध पैलूंविषयी नेहमी प्रश्न विचारत असे. कृष्णाच्या गोष्टी ऐकून मी नेहमीच प्रेरित झाले आहे आणि स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक चांगले करण्याची प्रेरणा मला त्यातून मिळाली आहे. मालिकेसाठी चित्रित होणार्या प्रत्येक दृश्यात माझी भावनिक गुंतवणूक खूप आहे, कारण हे प्रसंग मला लहानपणी माझी आई मला कृष्णाच्या गोष्टी सांगत असे, त्याची याद देतात.”
ती पुढे सांगते, “कथानकाचा आगामी भाग खूपच रोचक आहे. मैया यशोदा आपल्या छोट्या कान्हाच्या मुखात एक अलौकिक दृश्य पाहते. कृष्ण तिला असा संकेत देतो की, तो एक ब्रह्मांड आहे आणि सर्वसामान्य मानव नाही. ही गोष्ट ऐकून कान्हाचे काम करणारी त्रिशा अवाक झाली होती. तिला ही गोष्ट सांगताना मला खूप गंमत वाटली. तिचा प्रतिसाद बघायला खूप मजा आली आणि त्यामुळे आम्हा दोघींना आपापल्या व्यक्तिरेखांची अधिक ओळख पटायला मदतच झाली.”