no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पासमोर नात्याचे आव्हान
प्रेरणादायक कथानक आणि भावनात्मक दृष्ट्या समृद्ध व्यक्तिरेखा यांच्यामुळे सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने प्रेक्षकांचे मन काबिज केले आहे. पुष्पा (करुणा पांडे) आपले वकील बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे, पण येथेही तिच्यासमोर नवी आव्हाने येत आहेत, ज्यामध्ये तिच्या दृढतेची आणि तिच्या जवळच्या नातेसंबंधांचीही परीक्षा होत आहे. अलीकडच्या भागांमध्ये आपण पाहिले की, प्रोफेसर शास्त्री (गौरव चोप्रा) आणि त्यांच्या मुलीला, रिया (काजल)ला पुन्हा एकत्र आणल्याबद्दल पुष्पाला रोहिणीचा (प्रीतिका) सामना करावा लागतो. त्यानंतर, कादंबरी (वृंदा त्रिवेदी) जुगल (अंशुल त्रिवेदी) ला विश्वासात घेऊन सांगते की ती गरोदर असून त्याचेच बाळ तिच्या पोटात आहे.
आगामी भागांमध्ये पुष्पा भयंकर गोंधळात सापडलेली दिसेल. सोनल (भक्ती राठोड) दीप्ती (गरिमा परिहार)ची काळजी घेण्यासाठी पुष्पाच्या घरी राहायला येते. त्यामुळे बापोद्रा (जयेश भारभाया) शी सतत खटके उडू लागतात, कारण दोघांना आपापल्या मुलीची काळजी आहे. यामध्ये पुष्पाची पंचाईत होते. दुसरीकडे, पुष्पा प्रोफेसर शास्त्रीला कोयल (ईशा)ला मागणी घालण्यासाठी आग्रह करते. पण तिला कोयलचे धक्कादायक सत्य अजून समजलेले नाही. इकडे, जुगल जोपर्यंत बाप्पाची मूर्ती घरी घेऊन येत नाही, तोपर्यंत कादंबरी अन्नप्राशन करण्यास नकार देते. जुगल मात्र ही मागणी पुरवण्यास साफ नकार देतो.
सगळीकडे गोंधळ माजलेला असताना पुष्पा या वादळाचा सामना कसा करेल?
पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “सध्या अनेक संकटे अनेक बाजूंनी पुष्पाच्या मागे लागली आहेत. घरच्या आघाडीवर सोनल आणि बापोद्रा आपापल्या मुलीवरून एकमेकांशी झगडत आहेत. तर बाहेर, राजवीर-कोयल आणि प्रोफेसर शास्त्रीच्या प्रकरणात ती गुंतली आहे. यात भर म्हणून, कादंबरी जुगलकडे हट्ट धरून बसली आहे त्यामुळे पुष्पा त्रासली आहे, तिला जुगलची काळजी वाटते आहे. असे कितीतरी वेळा झाले आहे की, आपल्याला वाटते की या दबावाखाली आपण तग धरू शकणार नाही, पण पुष्पाची भूमिका करताना मी हे शिकले आहे की, वादळ कितीही तीव्र असले तरी तुम्ही माघार घ्यायची नसते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील असे क्षण आले आहेत, ज्यावेळी व्यक्तिगत आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमधील समतोल साधणे कठीण होऊन बसते, पण पुष्पाच्या भूमिकेने मला स्थिर राहण्यास आणि हळू हळू एक-एक समस्या सोडवण्यास शिकवले आहे.”