Home मनोरंजन योगेश त्रिपाठी यांचा पेन विकण्‍यापासून टेलिव्हिजनवरील लोकप्रिय दरोगा हप्‍पू सिंग बनण्‍यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

योगेश त्रिपाठी यांचा पेन विकण्‍यापासून टेलिव्हिजनवरील लोकप्रिय दरोगा हप्‍पू सिंग बनण्‍यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

2 min read
0
0
63

no images were found

योगेश त्रिपाठी यांचा पेन विकण्‍यापासून टेलिव्हिजनवरील लोकप्रिय दरोगा हप्‍पू सिंग बनण्‍यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

स्‍वप्‍ननगरी मुंबईमध्‍ये अनेक संघर्ष करणारे स्‍वप्‍न साकारण्‍याच्‍या आशेसह आले आहेत, पण काहीजणांनाच त्‍यांची स्‍वप्‍ने साकारता आली आहेत. त्‍यापैकी एक आहेत योगेश त्रिपाठी, जे एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगची भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय आहेत. त्‍यांची जीवनगाथा अत्‍यंत प्रेरणादायी आहे. त्‍यांनी मुंबईतील रस्‍त्‍यांवर पेन विकले आणि मन रमत नसलेले काम केले, ज्‍यानंतर टे‍लिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्‍यांपैकी एक बनले. त्‍यांचा प्रवास आदर्श आठवण करून देतो की, चिकाटी आणि अथक मेहनतीसह आव्‍हानात्‍मक संघर्षांमधून देखील प्रेरणादायी यश मिळू शकते.

आनंदाने सुरूवातीच्‍या संघर्षमय काळाला उजाळा देत योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग आपल्‍या स्‍वप्‍नांना वास्‍तविकतेत आणण्‍याच्‍या त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय गाथेबाबत सांगत आहेत. अभिनेता म्‍हणाले, “मी २००४ मध्‍ये मुंबईत पहिल्‍यांदा आलो तेव्‍हा माझ्याकडे मोठ्या स्‍वप्‍नांशिवाय काहीच नव्‍हते आणि विश्वास होता की मला स्‍वत:चे करिअर घडवायचे आहे. मला आजही शहरामध्‍ये केलेली पहिली नोकरी आठवते, ज्‍यासाठी मला ९५ रूपये पगार मिळायचा आणि थिएटरमध्‍ये मी प्रति शो ७५ रूपये कमवले. जीवन जगण्‍यासाठी मी १५० रूपयांना पेन विकले, १,५०० रूपयांसाठी लहान-लहान भूमिका साकारल्‍या आणि स्‍वप्‍न साकारण्‍याचे ध्येय कायम ठेवले. ३ वर्षे मी अथक मेहनत करत जगलो, पण यशस्‍वी होण्‍याच्‍या ध्‍येयाने मला प्रेरित करत ठेवले. २००७ मध्‍ये मला पहिली जाहिरात मिळाली, जिने स्थिती बदलली. त्‍यानंतर लोकप्रिय टीव्‍ही मालिकेमध्‍ये भूमिका मिळाली. पण जीवनाला कलाटणी देणारा खरा क्षण २०१५ मध्‍ये आला, जेथे मी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये हप्‍पू सिंगची भूमिका साकारण्‍यास सुरूवात केली. हळूहळू ही भूमिका इतकी लोकप्रिय बनली की चॅनेलने मला २०१९ मध्‍ये मोठा ब्रेक दिला आणि त्‍यामुळे मला माझी स्‍वप्नं साकारण्‍यास मदत झाली. मी मुंबईमध्‍ये माझे स्‍वत:चे घर आणि माझी स्‍वप्‍नवत कार खरेदी केली. माझ्यावर विश्वास दाखवण्‍यासाठी आणि मला संधी देण्‍यासाठी मी चॅनेलचे जितके आभार मानेन ते कमीच आहेत. मला आजही मुंबईमध्‍ये पहिल्‍यांदा आल्‍यानंतर ४ रात्र सीएसटी रेल्‍वे स्‍टेशनवर झोपल्‍याचे आठवते. तेव्‍हाच मी स्‍वत:शी निश्चय केला की, एकेदिवशी मुंबईमध्‍ये माझी स्‍वत:ची ४ घरं असतील आणि कोणतेही कर्ज न घेता ते स्‍वप्‍न पूर्ण केले. माझ्यासाठी हे फक्‍त यश नाही तर स्‍वप्‍न पूर्ण होण्‍याचे समाधान आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…