no images were found
“माझे मन तिच्यासोबत आहे,” : जुही परमार
प्रत्येक घरात एक कथा दडलेली असते – काही साजऱ्या होतात, तर अनेकदा काही न सांगितलेल्या राहतात. आपल्या नवीन ‘आपका अपना झी’ या ओळखीसह झी टीव्ही घेऊन येत आहे ‘कहानी हर घर की’ – एक हृदयस्पर्शी नॉन-फिक्शन मालिका, जी भारतीय महिलांना त्यांच्या मनात वर्षानुवर्षं दडवून ठेवलेल्या सत्यांना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित आणि आधार देणारी जागा देते. भावनिक उपेक्षा, सामाजिक दबाव, वैवाहिक संघर्ष किंवा वैयक्तिक त्याग असो – हा शो प्रामाणिक आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहाशिवाय संवादांची दारे उघडतो, जी प्रत्येक घरातल्या मनांना भिडतात.
प्रत्येक भागात एका प्रभावी खऱ्या जीवनकथेचे दर्शन घडते, ज्यामुळे जाणवते की काही कथा फक्त सांगितल्या जाण्यासाठी नसतात, तर त्या मनापासून ऐकल्या जाण्यासाठीही पात्र असतात. या शोच्या मुळाशी एक ठाम सामाजिक संदेश आहे – की विश्वासघात, उपेक्षा आणि असमानता हे कुटुंबातील विश्वास आणि स्थैर्य ढवळून काढू शकतात, तर समजूतदारपणा, जबाबदारी आणि मुक्त संवाद यांच्यामधून उपचाराचा प्रवास सुरू होऊ शकतो.
अशाच कथांपैकी एक आहे मध्य प्रदेशातील रेवा येथील सविताची. आपल्या नवऱ्या शिवेशकडून वर्षानुवर्षं विश्वासघात, उपेक्षा आणि भावनिक एकाकीपण सहन करत ती जगली आहे. तीन मुलांना स्वतःच्या कर्तृत्वाने वाढवूनसुद्धा तिला त्याच्या बेवफाईचा आणि जबाबदारी न घेण्याचा सामना करावा लागला. मात्र आपल्या कुटुंबाच्या सन्मानासाठी ती आपल्या तीन मुलांसोबत लढत राहिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या वळणावर, तिची मुलगी अंजलीही सांगते की वडिलांच्या निर्णयांनी त्यांच्या आयुष्यावर किती खोल जखमा उमटवल्या आहेत.
जुही परमार म्हणाली, “एक स्त्री म्हणून सविताने वर्षानुवर्षं जे दुःख उराशी बाळगले आहे, त्याची मी फक्त कल्पनाच करू शकते – प्रेम, निष्ठा आणि आधाराची वाट पाहत राहिली, पण त्याऐवजी तिला उपेक्षा आणि विश्वासघात सहन करावा लागला. मला सर्वाधिक वेदना याची होते की तिच्या मुलांना, विशेषतः अंजलीला (जसे एपिसोडमध्ये पाहायला मिळाले) अशा चुका सहन कराव्या लागल्या ज्या त्यांच्या नव्हत्या. ‘कहानी हर घर की’ वर सवितासारख्या कथा आपल्याला आठवण करून देतात की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक वर्षांची दडवलेली जखम असू शकते. त्या वेदनेबद्दल उघडपणे बोलण्यासाठी अफाट ताकद लागते आणि तिने इतकी वर्षं शांतपणे सहन केलेल्या सगळ्या गोष्टींसाठी माझे मन तिच्यासोबत आहे.”
ही केवळ सविताची कहाणी नाही, तर असंख्य महिलांची कहाणी आहे – आणि झी टीव्ही त्यांना व्यासपीठ देत आहे.