no images were found
तुळजाभवनी मंदिरातील ड्रेस कोड निर्बंध निर्णय घेतला मागे
तुळजाभवानी मंदिरात कपड्यांवर निर्बंधाच्या फलकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाविकांमधून संताप व्यक्त केला जात होता तुळजापूर: तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे फलक मंदिर परिसरात लावल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कपड्यांवर निर्बंधाच्या या फलकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाविकांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लागू केले नसल्याचं स्पष्टीकरण तहसिलदार सौदागर तांदळे यांनी दिलं आहे.
मंदिरात आता भाविकांना कपड्याच्या कोणत्याही निर्बंध शिवाय प्रवेश दिला जात आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांकडून रात्री काढण्यात आले. दुपारी मंदिर प्रशासनाने मंदिरात तोडक्या कपड्याने जात येणार नाही, असा निर्णय अचानक घेतला. त्यासंदर्भातील फलक लावण्यात आले. दुपारीनंतर वेस्टर्न कपडे किंवा तोडके कपडे असणाऱ्या कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्यांना काल नो एन्ट्री केली होती. त्याबाबत बॅनर सुद्धा लावले होते. मात्र तो निर्णय मागे घेतला असून बॅनर काढले आहेत. अवघ्या 7 तासात मंदिर संस्थांनाने भूमिका बदलत निर्णय मागे घेतला आहे.
तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली होती. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. गुरुवारी तोडके कपडे असलेल्या भाविकांना मंदिर प्रवेशदारावर अडवण्यात आले होते. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे मंदिर संस्थांनने आवाहन केले होते.