Home शासकीय अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

10 second read
0
0
18

no images were found

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

कोल्हापूर, : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्य मार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 58 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला मिळणारा ते एमआयडीसी पूल कसबा बावडा रस्ता शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी आंबेवाडी, चिखली मार्गे वाहतुक सुरु. तसेच शिये कसबा बावडा रस्त्यावर महानगरपालिका हद्दीत पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग शिये फाटा राष्ट्रीय महामार्ग शिरोली नाका, कोल्हापूर मार्गे सुरु.

चंदगड येथील राज्य मार्ग 189 वरील कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी राज्य महामार्ग 189 ते प्रजिमा 76 पाटणे फाटा मार्गे राज्य महामार्ग 180 वरुन हलकर्णी फाटा दाटे मार्गे चंदगड मार्गे वाहतुक सुरु.

गडहिंग्लज येथील राज्य मार्ग 189 वरील कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागाव प्रमुख जिल्हा मार्ग 83 मार्गे वाहतुक सुरु.

करवीर येथील राज्य मार्ग 189 वर कोल्हापूर गारगोटी गडहिंग्लज नागणवाडी, चंदगड, हेरे, तिलारी रस्ता हळदी गावात पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. पर्यायी कोल्हापूर इस्पुर्ली, शेळेवाडी मार्गे वाहतुक सुरु आहे.

राधानगरी येथील राज्य मार्ग 178 वर देवगड-राधानगरी-मुरगुड-निपाणी वर मुरगूड जवळ 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी रस्ता मुरगुड चिमगाव मार्गे गारगोटी व कोल्हापूर तसेच निढोरी कागल.

चंदगड येथील राज्य मार्ग 201 वर चंदगड-हिंडगाव-इब्राहिमपूर चितळे- आजरा रस्ता इब्राहिमपूर पुल (घटप्रभा नदी) किमी 5/600, 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे पर्यायी रामा 180 ते कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर प्रजिमा 66 मार्गे वाहतुक सुरु आहे.

आजरा येथील रा.मा.201 वरील चंदगड, हिंडगाव, इब्राहिमपूर, चितळे, आजरा रस्ता उचंगी धरणाचे बॅक वॉटर मधील मोरी व पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी पोहाळे, पोहळवाडी मार्गे बाजारभोगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा येथील राज्य मार्ग 193 वरील आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 4 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी पोहाळे, पोहळवाडी मार्गे बाजारभोगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

पन्हाळा येथील राज्य मार्ग 193 वरील आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 5 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी मलकापूर मार्गे कोल्हापूर वाहतुक सुरु आहे.

करवीर येथील राज्य मार्ग 193 वरील आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर प्रयाग पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी बालिंगे, खुपिरे, येवलूज, निटवडे, वरणगे, पाडळी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ येथील राज्य मार्ग 195 वर रा.मा.क्र. 178 पासून निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड रा.मा. क्र. 153 ला मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 वर 4 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे पर्यायी मार्ग हेरवाड, पाचवा मैल मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले येथील राज्य मार्ग 195 वर रा.मा.क्र. 178 पासून निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड रा.मा. क्र. 153 ला मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 वर 1 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, रुई मार्गे वाहतुक सुरु आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…