
no images were found
लोकसभा जागा वाटपात ठाकरे गट दोन पाऊलं मागं?
महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक बैठक देखील पार पडली. लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर येणाऱ्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरुय. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं सुरुवातीला 20 जागांवर दावा करणारा ठाकरे गट दोन पऊलं मागं का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील. दादरा नगर हवेलीमधून देखील आमचा एक खासदार विजयी होईल. लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर सुरुवातील 20 जागांवर दावा करणारा शिवसेना ठाकरे गट दोन पऊलं मागं आला आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.