Home मनोरंजन ‘सांस्कृतिक कलादर्पण’ सोहळ्यात होणार कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ सत्कार

‘सांस्कृतिक कलादर्पण’ सोहळ्यात होणार कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ सत्कार

6 second read
0
0
157

no images were found

‘सांस्कृतिक कलादर्पण’ सोहळ्यात होणार कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ सत्कार

मुंबई : चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२३’ सोहळा यंदा २ मार्च रोजी होणार असून यंदा या सोहळ्याचे २५वे वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ यावेळी सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा महोत्सव रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी दिली.
   कला क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंताना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार  सुरेश जयराम  ( ज्येष्ठ लेखक ), सुबोध गुरुजी ( ज्येष्ठ पोस्टर डिझायनर ), दत्ता थिटे (ज्येष्ठ संगीतकार ), प्रकाश भेंडे ( ज्येष्ठ निर्माते आणि अभिनेते ), राम अल्लम  ( ज्येष्ठ कॅमेरामन), रवी दिवाण  ( ज्येष्ठ फाईट मास्टर ), शकुंतला नगरकर ( जेष्ठ लावणी कलावंत ), विजय कुलकर्णी ( जेष्ठ चित्रपट वितरक आणि टूरिंग टॉकीज मालक ), उल्हास सुर्वे (ज्येष्ठ बॅकस्टेज आर्टिस्ट), सदानंद राणे (ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक), शिवाजी पाटील (ज्येष्ठ शाहीर), सचिन चिटणीस (ज्येष्ठ पत्रकार), राजन वर्धम (ज्येष्ठ रंगभूषाकर), पितांबर काळे (ज्येष्ठ दिग्दर्शक), पुंडलिक चिगदुळ (ज्येष्ठ लाइटमन दादा), व्ही. एन. मयेकर (ज्येष्ठ संकलक), मंगेश कुलकर्णी (ज्येष्ठ गीतकार), मिलिंद आस्टेकर (ज्येष्ठ निर्मिती व्यवस्थापक), कैलास नारायणगांवकर (ज्येष्ठ तमाशा फड मालक), हरि पाटणकर (ज्येष्ठ बुकिंग क्लार्क), बाळू वासकर (ज्येष्ठ उपहार व्यवस्थापक), बबन बिर्जे (ज्येष्ठ स्पॉट दादा), अनंत वालावकार (ज्येष्ठ नेपथ्यकार), जयवंत देसाई (ज्येष्ठ प्रकाश योजनाकार), मोहन आचरेकर (ज्येष्ठ कलादिग्दर्शक) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर सांस्कृतिक कलादर्पणतर्फे चित्रपटांची स्पर्धा घेण्यात आली त्यात एकूण ४२ सिनेमांनी भाग घेतला होता. त्यातून अंतिम चित्रपट महोत्सवासाठी पुढील १० सिनेमांची निवड करण्यात आली असून पिकासो, मदार, ताठ कणा, दगडी चाळ २, धर्मवीर, बालभारती, झोलीवुड, वाळवी, इंटरनॅशनल फालमफोक, समायरा या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.  रमेश मोरे, अशोक कुलकर्णी, मनोहर सरवणकर, सुनील खेडेकर, विजय राणे यांनी चित्रपटांचे परीक्षण केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…