no images were found
जगभरात पुन्हा ‘एलन मस्क’च्या श्रीमंतीचा डंका! संपत्ती १८७ अब्ज डॉलर
नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२३ महिन्याच्या शेवटच्या दिवशी जगातील टॉप-१० अब्जाधिशांच्या यादीत मोठे फेरबदल झाला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क पुन्हा एकदा जगातील अतिश्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या २४ तासांत मस्कच्या एकूण संपत्तीत वाढ झाल्याने एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अशाप्रकारे डिसेंबर २०२२ मध्ये पहिल्या क्रमांकाच्या विराजमान झालेले फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट १८५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. २०२३ वर्षाच्या सुरुवातीला मस्कची एकूण संपत्ती १३७ अब्ज डॉलर होती. तर ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, त्याच्या संपत्तीत फक्त दोन महिन्यांत ५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त भर पडली आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण आणि ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर एलन मस्कच्या संपत्तीतही मोठी घट झाली. परिणामी मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर घसरले, पण प्रत्येकाचा वेळ बदलतो. गेल्या दोन महिन्यात टेस्लाच्या शेअर्समध्ये ९० टक्क्यांनी झेप घेतली आणि एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत पैसा आज आहे उद्या नाही पण… असं म्हणतात. काल जो गरीब होता तो आज श्रीमंत आहे आणि आजचा श्रीमंत उद्या गरीबही होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा खऱ्या ठरतात. काही दिवसांतच गौतम अदानी जगातील तिसर्या क्रमांकावरून आता पहिल्या ३० अब्जाधिशांच्या यादीतूनही बाहेर फेकले गेले आहेत.
डिसेंबरमध्ये होते दुसऱ्या क्रमांकावर
मस्क २०२१ मध्ये जगातील अतिश्रीमंत बनले होते, पण गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये टॉप-१० अब्जाधीशांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या मस्कला मागे टाकून बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत बनले. उल्लेखनीय आहे की २०२२ वर्ष मस्कसाठी खूप वाईट ठरले. ४४ अब्ज डॉलर्सच्या ट्विटर डीलच्या सुरुवातीपासून त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये जोरदार घसरण सुरू झाली आणि वर्षाच्या शेवटपर्यंत त्यात पडझड सुरूच राहिली. गेल्या वर्षी, मस्कने सर्वाधिक संपत्ती गमावली, पण त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये वाढ झाली, जी अजूनही वाढत आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची जगातील श्रीमंतांच्या यादीत घसरण सुरूच आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या संपत्तीत ८२.८ अब्ज डॉलर्सची घट झाली असून यामुळे त्यांची नेटवर्थ ३७.७ अब्ज डॉलर्सवर घसरली आहे. त्यामुळे आ श्रीमंतांच्या यादीत ते ३२व्या स्थानावर फेकले गेले आहेत. हिंडेनबर्गच्या एका अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स तोंडघशी पडत आहेत.