
no images were found
पर्तगाळी मठाच्या वतीने कोल्हापूर पंचक्रोशीत लवकरच मठ मंदिरासह बाल संस्कार शिक्षण उपक्रम सुरू करणार – श्री श्रीपाल विद्याधीश स्वामीजी .
कोल्हापूर (प्रतिनीधी ) – येत्या ऑक्टोंबर महिन्यात 550 व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या पर्तगाळी गोवा येथे मुख्यालय असलेल्या गोकर्ण पर्तगाळी मठाच्या वतीने कोल्हापूर पंचक्रोशीत लवकरच मठ – मंदिर – बाल संस्कार शिक्षण सुरू करू असा संकल्प ‘ मठाचे 24 वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी आज पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला . आमच्या मागील पिढीतील ज्येष्ठ गुरुची ही अशी तीव्र ईच्छा होती , त्याची परिपूर्ती अग्रकमाने करण्यासाठी कोल्हापूर पंचक्रोशी सह गोवा , कारवार , बेळगांव , मंगलूर , उडपी , सांगली , सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग मधील भाविकांची सहकुटुंब आपले तम – मन – धनपूर्वक योगदान देतील असे ही ठामपणे त्यांनी नमूद केले. आगामी वर्षातील रामनवमी पर्यंत तमाम भक्तगण – अनुयायी यांच्या सहभागाने 550 कोटी ‘ श्रीराम जय राम जय जय राम ‘ या मंत्राचे पठण करून एक सामाजिक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी चे करायचे आहे त्याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन विविध ठिकाणी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगत आगमी काळात विविध कार्यासाठी आपण कोल्हापूरी आदिशक्ती महालक्ष्मी तथा अंबाबाई च्या सहवासात नक्कीच येऊ असा मनोदय ही त्यांनी व्यक्त शेवटी व्यक्त केला . भाजपा नेते खासदार धनंजय महाडीक आणि अंरुधती महाडीक यांनी सपत्नीक त्यांचे दर्शन घेतले आणि विविध विषयावर संवाद साधाला . नागपूर – गोवा महामार्गामुळे चौफेर प्रगतीला गती येईल ‘ असे त्यांनी यावेळी सांगितले . त्यासह भाजपाचे राहूल चिकोडे , पणजी गोवा येथील डेपो उद्योग समुहाचे पै सह शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवराशी त्यांनी संवाद सांधला . तर सकाळी अंबाबाई – महालक्ष्मी देवी चे अगदि साध्या पद्धतीने दर्शन घेतील अभिषेकासह विविध धार्मिक विधीदी केले .
या भव्य सोहळ्यासाठी सारस्वत समाज उपशाखा जीएसबी कोकणी व्यासपीठ चे अध्यक्ष करुणाकर नायक , सचिव सचीन शानभाग – सुरेंद्र प्रभु , गुरुराज शानभाग महिला च्या सुमंगल पै , कामाक्षी बालींगा ,गोकुळ, अक्षता मंगल कार्यालय, यात्री निवास सह कार्यकारणी समावेत सुशांत पै , उमेश प्रभु , दिनेश प्रभू , रामनाथ बालिंगा , उदय कामत , आनंद – गुरुराज शानभाग , नित्यानंद प्रभु , मनोज शानभाग नित्यानंद प्रभु , सह युवा आघाडी चा चे सक्रिय सहभाग राहीला आहे . . .