Home राजकीय पराभवानंतर ६ महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये : धनंजय महाडिकांचा पलटवार

पराभवानंतर ६ महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये : धनंजय महाडिकांचा पलटवार

0 second read
0
0
165

no images were found

पराभवानंतर ६ महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये : धनंजय महाडिकांचा पलटवार

कोल्हापूर: उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून वादंग निर्माण झाल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उचगाव ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा घ्यावी या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावरून सतेज पाटील यांनी महाडिक गटाला नाव न घेता टोला लगावला होता व पराभव पचवण्याची ताकद पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देताना पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी शिकवू नये, असा टोला लगावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव ग्रामपंचायतच्या निकालानंतर हे दोन्ही दिग्गज नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
खा. महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेवरून प्रतिक्रिया दिली. महाडिक म्हणाले की, पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये. अनेक पराभव पचवून आम्ही शिखरावर पोहोचलो आहे. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने सत्ता कायम राखल्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा काढून फेरमतदानाची मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना विजयाचा आनंदोत्सव साजरा करता तसा पराभव पचवण्याची देखील तयारी लागते अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना महाडिक यांनी आम्ही अनेक पराभव पचवून पुन्हा उदयास आलो आहे. त्यामुळे पराभवानंतर अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये.
उचगावमध्ये मतदान झाल्यानंतर सतेज पाटील यांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे उचगावातील ग्रामस्थांचं केवळ एकच म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी करावी. आपण ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा केला जाईल असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…