no images were found
आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांकडून ‘पॉझिटिव्ह लाइफ लेसन्स’
आपल्या कुटुंबामधील पाळीव प्राणी आपला दिवस प्रेम, आनंद व साहचर्यासह उत्साहपूर्ण करतात. त्यांची निष्ठा व आपुलकी आपल्याला अतूट प्रेमाची जाणीव करून देते. नॅशनल पेट डे साजरा करण्यानिमित्त एण्ड टीव्हीवरील कलाकार त्यांचे पाळीव प्राणी आणि त्यांच्या प्रेमाबाबत व निष्ठेबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत राहुल जेठवा (मालिका ‘अटल’मधील अवध बिहारी वाजपेयी), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश सिंग) आणि विदिशा श्रीवास्तव (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अनिता भाबी). मालिका ‘अटल’मधील राहुल जेठवा ऊर्फ अवध बिहारी वाजपेयी म्हणाले,“पाळीव प्राणी आपल्या जीवनात आनंद आणतात. आपण कामावरून घरी आल्यानंतर ते दरवाज्यावर आपले स्वागत करतात, अवघड काळादरम्यान त्यांची उपस्थिती उत्साह निर्माण करते. आपले केसाळ सोबती अतूट प्रेम व आनंदासह आपला दिवस उत्साहपूर्ण करतात. माझा कुत्रा सत्विक याचे नाव आध्यात्मिकतेवरून ठेवण्यात आले आहे, ज्यामधून माझा आध्यात्मिकतेचा प्रवास दिसून येतो. माझ्या बहिणीच्या विवाहानंतर मी एकटा झालो असताना तो माझ्या जीवनात आला आणि त्याचे प्रेम व आपुलकीने बहिणीची कमी काहीशी भरुन काढली. आमच्याकडे फिश टँक देखील आहे, आम्ही त्या टँकमधील माशांना पोहताना पाहत वेळ व्यतित करतो आणि आमचा तणाव दूर होतो. या दोघांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. कुत्रा आपल्याला निष्ठा, साध्या क्षणांमध्ये आनंदी राहण्यास व अतूट प्रेम व्यक्त करण्यास शिकवतो, तर मासे आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्याची, सुसंगता राखण्याची शिकवण देतात, ज्यामुळे स्थिरता, सामुदायिक भावना असे उत्तम गुण विकसित होण्यास मदत होऊ शकते.”
मालिका “हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, “दिवसामधील माझा सर्वात आनंदमय किंवा आवडता क्षण म्हणजे माझा कुत्रा‘बम बम’सोबत खेळणे आणि त्याला मिठी मारणे. त्याच्या सहवासात खूप उत्साही वाटते. तो उत्साही व प्रामाणिक आहे आणि त्याचे नाव माझा आवडता देव भगवान शिव यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. पाळीव प्राणी आपला मूड उत्साहित करू शकतात आणि आपला दिवस आनंदमय करू शकतात, मग ते मांजराची सांत्वन करणारी गुरगुर असो किंवा कुत्रा आनंदाने त्याची शेपूट हलवत असो त्या क्षणांमधून खूप आनंद मिळतो. ते आपल्याला सर्वात मोठी शिकवण देतात ती म्हणजे क्षमा. नाराज असो किंवा उदास असो त्यांच्यामध्ये इतरांना माफ करण्याची क्षमता आहे. आणखी एक शिकवण म्हणजे अतूट प्रेम. ते आपल्या त्रुटी किंवा चुकांकडे दुर्लक्ष करत आपल्यावर बिनशर्त प्रेमाचा वर्षाव करतात. आपल्याला मन मोठे ठेवण्याची, इतरांवर मनापासून प्रेम करण्याची आणि कोणतीही आशा न बाळगता सहानुभूती, दयाळूपणा व स्वीकृती व्यक्त करण्याची शिकवण देतात.”
मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या,“माझ्या मते आपण पाळीव प्राण्यांना निवडत नाही, तर ते आपल्याला निवडतात. तीन वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत हे खरे ठरले. मी माझ्या घरामध्ये एका कुत्र्याला आणले आणि एकत्र हृदयस्पर्शी प्रवास सुरू झाला. त्याच्या अंगावरील सफेद फर आणि मनमोहक डोळे पाहून आम्ही त्याचे नाव ‘फॉक्सी’ ठेवले आणि तो अगदी सफेद कोल्ह्यासरखा दिसतो. त्याचे उत्साही व्यक्तिमत्त्व माझ्या जीवनात आनंद आणते आणि त्याच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या मागे फिरत राहतो. या सर्व धमालीसह तो माझ्यासाठी तणाव दूर करणारा आणि अविरत सोबती आहे, जो त्याचे प्रेम व आनंदासह माझा दिवस उत्साहपूर्ण करतो. पाळीव प्राणी आपले जीवन उत्साहपूर्ण करतात, आपल्याला साहचर्य, सहानुभूती आणि जीवनात लहान-लहान क्षणांचा देखील आनंद घेण्याची शिकवण देतात. वर्ल्ड पेट डे निमित्त मानवजाती आणि त्यांचे केसाळ सोबती यांच्यामधील अतूट नात्याला साजरे करूया.”