no images were found
एनआयए, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने संशयित दहशतवादी जेरबंद
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कडून मुंबई पोलिसांना एक ई-मेल पाठवण्यात आला. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला. या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी एका संशयित दहशतवाद्याला इंदूर येथून ताब्यात घेतलं आहे. संशयिताचे सरफराज मेमन असे नाव आहे.
एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेननला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयएने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. एनआयए ने माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे.
सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती एनआयएने दिली होती. या माहितीच्या आधारे एनआयएने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. एनआयएच्या माहितीच्या आधारे
एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार, तपास यंत्रणाकडून तपास सुरु होता. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.
मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, अशी माहिती एनआयएने मेलद्वारे पोलिसांना दिली होती. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रंही पाठवली होती. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संपर्क साधत सविस्तर माहिती दिली. यानंतर वाँटेड दहशतवादी सरफराज मेमनला इंदूरमध्ये अटक करण्यात आली. २०१८ मध्ये पीएफआयच्या संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी होता. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सरफराजच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
सरफराज मेमन हा इंदूरच्या चंदन नगरचा रहिवासी आहे. तो बऱ्याच दिवसांपासून खजराना परिसरातील मशिदीजवळ राहत होता. त्याने येथे मेडिकल स्टोअरही उघडले होते. सरफराजने सांगितले की, त्याने हाँगकाँगमध्ये एका चिनी महिलेशी लग्न केले होते. तिच्याशी वाद झाल्यानंतर तो येथे आला होता. इथे भारतातही त्यांनी ४ लग्ने केली आहेत. याबाबत सर्वांची विचारपूस केली जात आहे.
मुंबई शहर कायमच दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी राहिलं आहे. २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्यांपासून मुंबईसारख्या शहरांचं संरक्षण केलं आहे. दरम्यान, आता ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याच्या चौकशीनंतर याबाबतीत पुढील माहिती समोर येईल. तपास यंत्रणांकडून या कामांना वेग आला आहे.