
no images were found
गुगल, घड्याळं, पिस्तूल, जिवंत काडतुसं, जॅग्वॉर कार : या चोराची बातच न्यारी
पुणे : घरफोडी आणि चोरीचे तब्बल २७ गुन्हे ज्याच्यावर दाखल आहेत अशा एका अट्टल चोरट्याने पुण्यात एका राज्यातील एका वजनदार राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरात चोरी केली. पोलिसांनी आव्हान समजून या चोरीचा छडा लावला. चोराला थेट पंजाबमध्ये जाऊन पकडून आणले. पण या चोराची गुगलच्या सहाय्याने चोरी करण्याची अद्यावत पद्धत,चोरीतील रक्कम, मुद्देमाल, पाहून पोलीसही आवक झाले.
चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंधू सोसायटीत जबरी चोरी झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री,विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे नातेवाईक जगदीश कदम यांच्या घरी ही चोरी झाली होती. या घरातून रोख रक्कम आणि बंदूक चोरून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट पंजाबमध्ये जाऊन आरोपीला अटक केली. मोहम्मद इरफान असं नाव असणाऱ्या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद इरफानविरोधात घरफोडी आणि चोरीचे तब्बल २७ गुन्हे दाखल नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रॉबिनहूड असं या आरोपीचं टोपण नाव आहे.
पोलिसांनी मोहम्मद इरफानला अटक केल्यानंतर त्याची छाडाछडती घेतली असता अनेक मौल्यवान गोष्टी सापडल्या आहेत. यामध्ये जॅग्वॉर कंपनीची आलिशान कारही आहे. याशिवाय महागडी घड्याळं, पिस्तूल आणि जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत. चोरीसाठी इरफान गुगलची मदत घेत होता. गुगलवर तो वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या श्रीमंत लोकांची माहिती घेत असे. यानंतर तो चोरीची संपूर्ण योजना आखण्यासाठी गुगलची मदत घेत असते. म्हणजे चोरी कशी करायची, ती केल्यानंतर तिथून पळ कसा काढायचा यासाठीचे मार्ग हे सर्व तो गुगलवर शोधत असे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.