Home मनोरंजन कलाकार त्‍यांच्‍या वडिलांना आदर्श मानतात!

कलाकार त्‍यांच्‍या वडिलांना आदर्श मानतात!

3 min read
0
0
37

no images were found

कलाकार त्‍यांच्‍या वडिलांना आदर्श मानतात!

फादर्स डे प्रेम, मार्गदर्शन व अविरत पाठिंबा देत आपल्‍या जीवनाला आकार दिलेल्‍या वडिलांना सन्‍मानित करण्‍याप्रती समर्पित खास दिवस आहे. हा दिवस वडिलांना प्रशंसित करतो, जे अनेक त्‍याग करत बहुमूल्‍य मार्गदर्शन करतात आणि आपल्‍या जीवनाला घडवतात. आपल्‍यापैकी अनेकजण वडिलांना आदर्श मानतात. इंटरनॅशनल फादर्स डे निमित्त एण्‍ड टीव्‍ही कलाकारांचे हृदयस्‍पर्शी संदेश वडिल व त्‍यांच्‍या मुलांमधील दृढ भावनिक नात्‍याला सादर करतात. ही भावना आपल्‍यापैकी अनेकांशी संलग्‍न आहे. हे कलाकार आहेत नेहा जोशी (मालिका ‘अटल’मधील कृष्‍णा देवी वाजपेयी), योगेश त्रिपाठी (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्‍पू सिंग) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी).मालिका ‘अटल’ मध्‍ये कृष्‍णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्‍हणाल्‍या, ”माझे वडिल रंगभूमी कलाकार आहेत. मोठे होत असताना मी त्‍यांना मंचावर परफॉर्म करताना पाहिले आणि त्‍यांच्‍याकडून अभिनयाचे अनेक धडे घेतले आहेत. मी आज जे कोणी आहे त्‍याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते. ते नेहमी माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ते ऑडिशन्‍स, रिजेक्‍शन्‍स आणि स्‍वत:च्‍या क्षमतेबाबत शंका निर्माण झाल्‍यास त्‍याचे निराकरण करण्‍यामध्‍ये माझे मोठे मार्गदर्शक राहिले आहेत. त्‍यांनी नेहमी मला माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍यास पाठिंबा देण्‍यासोबत प्रेरित केले आहे. त्‍यांनी मला अनेक आव्‍हानांचा सामना करताना, निराश होत रडताना आणि अनिश्चित क्षणाचा सामना करताना पाहिले, तसेच माझा निर्धार व आवड देखील पाहिली. मी साकारलेल्‍या भूमिकांसोबत माझी चिकाटी व दृढनिश्‍चयावर त्‍यांचा विश्‍वास होता. विशेषत: खडतर निर्णय घेताना त्‍यांची हुशारी व मार्गदर्शन बहुमूल्‍य राहिले आहे. पप्‍पा, तुम्‍ही माझे हिरो व आदर्श आहात. तुमचे प्रेम, ताकद आणि माझ्यावरील अविरत विश्‍वासामुळे मी आज सर्वोत्तम व्‍यक्‍ती बनले आहे आणि मी तुम्‍हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहिन. थोर वडिल म्‍हणून कर्तव्‍य बजावण्‍यासाठी तुमचे मनापासून आभार.”

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटनमध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी म्‍हणाले, ”माझ्या वडिलांनी मला नेहमी स्‍वत:शी प्रामाणिक राहण्‍याचे आणि माझ्या अद्वितीय गुणांचा अवलंब करण्‍याचे महत्त्व सांगितले. त्‍यांनी माझ्यामध्‍ये आत्‍म-प्रेम व मानवतावादी मूल्‍ये बिंबवली, ज्‍यामधून माझे चारित्र्य उत्तमरित्‍या घडले आहे. मी आज जे कोणी आहे ते घडवण्‍यासाठी मी त्‍यांचा सदैव ऋणी आहे. त्‍यांचा प्रभाव अतुलनीय राहिला आहे. प्रबळ शैक्षणिक पार्श्‍वभूमीसह ते शिस्‍तबद्ध असण्‍यासोबत आपुलकीची भावना देखील दाखवायचे. त्‍यांनी मला अथक मेहनत, शिस्‍तबद्धता, प्रामाणिकपणे वागण्‍याचे महत्त्‍व शिकवले. या बहुमूल्‍य शिकवणीमुळे माझी वैयक्तिक व व्‍यावसायिक प्रगती झाली आहे. हे गुण व मूल्‍ये मी माझ्या मुलांना देखील देत आहे. मी जसे आदर्श म्‍हणून माझ्या वडिलांकडे पाहिले तसे त्‍यांनी देखील माझ्याकडे आदर्श म्‍हणून पहावे अशी माझी इच्‍छा आहे. या खास दिनानिमित्त मी सर्व वडिलांना मन:पूर्वक शुभेच्‍छा देतो. त्‍यांचे प्रेम, मार्गदर्शन व अविरत पाठिंबा अतुलनीय आहे. वडिलांचे आपल्‍या मुलांप्रती अविरत प्रेमाशी कोणीच जुळू शकत नाही आणि आज, आपण त्‍या असाधारण नात्‍याला साजरे व प्रशंसित करत आहोत.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ”अनेक क्षण आहेत, जेथे माझ्या वडिलांनी मला खास भावना दिली आणि आदर्श म्‍हणून त्‍यांचे स्‍थान अधिक दृढ केले. लहान शहरातून असल्‍यामुळे मी अभिनेत्री बनण्‍याचे स्‍वप्‍न सांगितल्‍यानंतर सुरूवातीला सर्वांच्‍या मनात संदिग्‍धता होती. पण, माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला आणि मला माझे स्‍वप्‍न साकारण्‍यास मदत केली. आम्‍ही दोघी बहिणी होतो, त्‍यांनी आम्‍हाला मोठे केले, आमच्‍या स्‍वप्‍नांना पाठिंबा दिला आणि पालक त्‍यांच्‍या मुलांचे जीवन घडवण्‍यामध्‍ये बजावणारी महत्त्‍वाची भूमिका दाखवून दिली. त्‍यांनी मला दिलेल्‍या शिकवणी मी माझ्या मुलीला देत आहे. एक संस्‍मरणीय क्षण म्‍हणजे मी बोर्ड परीक्षेमध्‍ये चांगल्‍या गुणांसह उत्तीर्ण झाले आणि आणखी एक क्षण म्‍हणजे त्‍यांनी मला पहिल्‍यांदा पडद्यावर पाहिले. त्‍यांचा अभिमान व त्‍या काळादरम्‍यान पाठिंबा अविश्‍वसनीयरित्‍या प्रेरक ठरला. साध्‍या क्रियाकलापांना अर्थपूर्ण अध्‍ययन अनुभवांमध्‍ये बदलण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतेने मला नेहमी प्रेरित केले. त्‍यांची कामाप्रती समर्पितता आणि आमच्‍या कुटुंबाप्रती अविरत कटिबद्धतेने मला जबाबदारी व प्रेमाचे खरे महत्त्व दाखवून दिले आहे. या खास दिनी, मी माझे मार्गदर्शक, शिक्षक असण्‍यासोबत अविरत पाठिंबा देण्‍यासाठी माझ्या वडिलांचा सन्‍मान करते. ते माझे वडिल असण्‍यासोबत माझे हिरो व आदर्श आहेत. फादर्ड डेच्‍या आनंदमय शुभेच्‍छा.” या कलाकारांच्‍या व्‍यावसायिक जीवनावर त्‍यांच्‍या वडिलांनी टाकलेल्या प्रभावांचा या गाथा आपल्‍या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…