Home आरोग्य मधुमेह चिकित्सेमध्ये भारत जगाला मार्ग दाखवू शकतो  – डॉ.व्ही मोहनचेलाराम 

मधुमेह चिकित्सेमध्ये भारत जगाला मार्ग दाखवू शकतो  – डॉ.व्ही मोहनचेलाराम 

27 second read
0
0
11

no images were found

मधुमेह चिकित्सेमध्ये भारत जगाला मार्ग दाखवू शकतो  – डॉ.व्ही मोहनचेलाराम 

  पुणे, : भारतामध्ये आपण स्वेदशी बनावटीची किफायतशीर वैद्यकीय उपकरणे,मॉलिक्युल्स,थेरपीज्‌‍ विकसित करून ती जगाला देऊ शकतो. मधुमेह चिकित्सेमध्ये जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे,असे मत मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व डॉ.मोहनस्‌‍ डायबेटिस स्पेशालिटिज सेंटर,चेन्नईचे अध्यक्ष डॉ.व्ही मोहन यांनी यावेळी व्यक्त केले. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे 7 ते 9 मार्च 2025 दरम्यान 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 (इंटरनॅशनल डायबेटिस समिट) चे आयोजन करण्यात आले होतेे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी स्वीडन येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्युटचे प्रा.डॉ.सी.व्ही.संजीवी, युके नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर) चे संचालक आणि सेंटर फॉर एथनिक हेल्थ रिसर्चचे संचालक आणि द रिअल-वर्ल्ड एव्हिडन्स युनिटचे संचालक डॉ.कमलेश खुंटी,चेलाराम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.प्रकाश भुपटकर, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए.जी.,  चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक व विंग कमांडर (डॉ.) हर्षल मोरे (निवृत्त) आणि वैद्यकीय सेवा विभागाच्या प्रमुख डॉ.वेदवती पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.व्ही मोहन यांना मधुमेह क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       याप्रसंगी बोलताना डॉ.व्ही मोहन म्हणाले की,ज्ञान हे प्रकाशासारखे असते आणि त्याचा प्रसार होत राहतो.या परिषदेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे तेच होत आहे.सध्याचा काळ हा भारतासाठी महत्त्वाचा आहे.भारतातील औषध निर्माण क्षेत्र हे जेनरिक्स आणि गुणवत्तेच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे.आपल्या गरजांप्रमाणे आपण स्वदेशी बनावटीचे किफायतशीर वैद्यकीय उपकरणे,थेरपीज्‌‍ विकसित करू शकतो.मधुमेह चिकित्सेमध्ये जगाला मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य भारतीय वैद्यकीय क्षेत्रात आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      प्रा.डॉ.सी.व्ही.संजीवी म्हणाले की,भारतात मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.याशिवाय मधुमेहाच्या पूर्व टप्प्यातील (प्रि डायबेटिक) संख्या देखील लक्षणीय आहे.त्यामुळे हे कमी करण्यासाठी जोखमीच्या घटकांचा विचार करून वेलनेस या संकल्पनेवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्याकडे एवढा मोठा माहितीसाठा असताना आपण आपल्या देशातील मधुमेह चिकित्सेचे वेगळे प्रारूप विकसित करू शकतो.

      डॉ.कमलेश खुंटी म्हणाले की,भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर नवकल्पना समोर येत आहेत,ही सकारात्मक बाब आहे.डॉ.प्रकाश भुपटकर यांनी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे अध्यक्ष श्री. लाल चेलाराम यांचा संदेश वाचून दाखवला.भारतातील संशोधन हे जगासाठी संदर्भ बनू शकतो,असे मत त्यांनी व्यक्त केले.मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहाच्या धोक्याचा व गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

         या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन संशोधन आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेमध्ये मधुमेहाचा सामना करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, गरोदरपणातील मधुमेह आणि प्रॅक्टिकल इन्शुलिन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या.नामवंत भारतीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांनी या परिषदेत संवाद साधला. या परिषदेला 2500 हून अधिक डॉक्टर्स उपस्थित होते. 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 चे उद्दिष्ट देशातील आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…