no images were found
एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन तर्फे महाराष्ट्रातील १० शाळांमध्ये स्टेम सायन्स लॅब्ज चे उद्घाटन,
एचडीएफसी बँके तर्फे त्याचा सीएसआर उपक्रम असलेल्या परिवर्तन उपक्रमा अंतर्गत ॲक्सेसिबल स्टेम सायन्स सेंटर्स चे मुंबई आणि पुण्यात उद्घाटन करण्यात आले. या सेंटर्स ची सुरुवात ‘स्टेम विदाऊट बॅरिअर्स’ कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आली आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे विशेष शाळांतील मूक आणि बधीर मुलांना सर्वसमावेशक शिक्षण मिळण्यासाठी मिनी लॅब्जची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्रातील १० शाळांसह भारतातील ३५ विशेष शाळांमध्ये करण्यात आली आहे.या प्रकल्पा अंतर्गत पुणे आणि मुंबईतील ५वी ते १० दरम्यानच्या ८८५ विद्यार्थ्यांना विशेषरुपाने तयार करण्यात आलेल्या आणि भारतीय साईन भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आलेला स्टेम कंटेंट उपलब्ध होणार आहे. जेणे करुन त्यांना वैज्ञानिक संकल्पना आकर्षक फॉरमॅट मध्ये उपलब्ध होतील. या प्रकल्पा मध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि कंटेंट सहज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उद्घाटन समारंभांचे आयोजन पुण्यातील आधार मूकबधीर विद्यालय आणि मुंबईतील बॉम्बे इन्स्टिट्यूशन फॉर डेफ ॲन्ड म्युट्स येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शाळांना संपूर्णत: कार्यरत असलेल्या स्टेम लॅब्ज सुपुर्द करण्यात आल्या, यामुळे आता त्यांना सर्वसमावेशक, तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण उपलब्ध होणार आहे.एचडीएफसी बँके द्वारे तीन वर्षांकरता अर्थसहाय्य करण्यात आलेला हा उपक्रम असून विशेष शाळांसाठी नाविन्य, उपलब्धता आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी असलेला पहिला असा अनोखा उपक्रम आहे. हा प्रकल्प सुरुवातीला कर्नाटकात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत अशाच प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्व सहभागी शाळांमध्ये सुरु राहणार आहे.
या उपक्रमा विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेचे डीएमडी श्री कैझाद भरुचा यांनी सांगितले “ आमचा असा ठाम विश्वास आहे की शिक्षण हे सर्वमसावेशक आणि समान असावे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे हे लक्ष्य आहे की सहकार्यात्मक शैक्षणिक वातावरण मुलांच्या गरजेनुसार योग्य वातावरण निर्माण करणे जेणेकरुन ऐकण्याचे आव्हान ते पेलू शकतील. शाळा आणि शिक्षकांबरोबर भागीदारी करणे आमच्यासाठी प्रोत्साहक असून आम्ही या प्रयत्नांसाठी वचनबध्द आहोत.”या प्रकल्पाची यशस्वी चाचणी कर्नाटकातील १३ शाळांत करण्यात आली आणि आता हा प्रकल्प पाच राज्यांत कार्यरत आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये श्री संतोष इंगळे, श्रीमती स्मिता जायभाये आणि श्री पंकज सेठ इत्यादी अंमलबजावणी साठीचे असलेल्या प्रमुख भागीदार उपस्थित होते, त्याच बरोबर श्री नरेंद्र पांड्ये (सीएसआर मॅनेजर), श्री गुरराघवेंद्र (शिक्षण प्रमुख) आणि श्री. लोकेश (प्रोजेक्ट मॅनेजर) इत्यादी उपस्थित होते.
हा उपक्रम म्हणजे एचडीएफसी बँक परिवर्तनच्या शैक्षणिक प्रसाराच्या स्तंभाच्या योजनेचा एक भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन मिशन तर्फे सर्वसमावेशक वाढ करुन दीर्घकालीन परिणाम हा समाजावर घडवण्यासह त्यांना स्वावलंबी होण्यास मदत करण्याचा एक भाग आहे .