no images were found
कलाकारांनी सांगितले त्यांनी बनवलेल्या पहिल्या डिशबाबत!
प्रत्येकाला किचनमध्ये पहिल्यांदा केलेली पाककला कायमस्वरूपी लक्षात राहते. चपात्या जाळण्यापासून आश्चर्यकारकपणे परिपूर्ण असा रस्सा बनवण्यापर्यंत प्रत्येक प्रयत्नाचे आपल्या मनात खास स्थान असते. एण्ड टीव्हीवरील कलाकार अमित भारद्वाज (मेवा, ‘भीमा’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’) जुन्या आठवणींमध्ये रमत त्यांनी बनवलेल्या पहिल्या पाककलेमागील गोष्टी सांगत आहेत. त्यांच्या गोष्टी पुढीलप्रमाणे! मालिका ‘भीमा’मधील अमित भारद्वाज ऊर्फ मेवा म्हणाले, “मी पहिल्यांदा बनवलेला खाद्यपदार्थ म्हणजे डाळ खिचडी. मी तेव्हा पीजीमध्ये राहत होतो आणि स्वत: बनवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मला भूक लागली होती आणि जवळपास काहीच खायला नव्हते. मी माझ्या आईला कॉल केला, तिने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी लिहून काढल्या आणि डाळ खिचडी बनवण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची बाब महणजे डाळ खिचडी चविष्ट झाली होती, ज्याचे श्रेय माझ्या आईला जाते, ज्यामध्ये नशीबाने साथ देखील दिली. तेव्हापासून डाळ खिचडी मला खूप आवडते. डाळ खिचडी सोप्या पद्धतीने बनवता येते, भूकेचे शमन करते आणि नेहमी मला पहिल्यांदा किचनमध्ये जाण्यास भाग पाडलेल्या क्षणाची आठवण करून देते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, “मी बनवलेला सर्वात पहिला खाद्यपदार्थ म्हणजे टोमॅटोची भाजी. मी तेव्हा तेरा वर्षांची होती आणि मला माझ्या आईला सरप्राइज द्यायचे होते. मला आठवते, मी लक्षपूर्वक बटाटे कापले होते आणि माझ्या आईच्या वापरण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करत सर्व मसाल्यांचा वापर केला होता. मी लाल मिरची खूप जास्त प्रमाणात टाकली होती, जे मला समजलेच नाही आणि कुटुंबातील सर्वजण डिनरच्या वेळी खूप पाणी पित होते (हसते). पण त्या सर्वांनी माझ्या प्रयत्नाचे कौतुक केले. खूपच तिखट असलेल्या त्या खाद्यपदार्थासह कूकिंगप्रती माझ्या आवडीची सुरूवात झाली. आता, मला कूकिंगमधून आनंद मिळतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, “मी बनवलेला पहिला खाद्यपदार्थ म्हणजे रव्याचा शिरा. मी कॉलेजमध्ये होते आणि अचानक मला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली. मला कूकिंगचा फारसा अनुभव नव्हता, पण मी माझ्या दादीला (आजी) अनेकवेळा रव्याचा शिरा बनवताना पाहिले होते. म्हणून, मी रव्याचा शिरा बनवण्यास सुरूवात केली. पहिल्यांदा काहीसा जास्त शिजवला, पण त्या सुगंध आणि प्रयासाने मला खास भावना दिली. मी आता पाककलेमध्ये निपुण झाले आहे. तरीही शिरा बनवताना त्या गोंधळलेल्या, पण अभिमानास्पद क्षणाची आठवण होते. त्या क्षणासह किचनमधील माझ्या प्रवासाची सुरूवात झाली.”