
no images were found
‘एनआयटी’स राज्यस्तरीय फुटबॉल विजेतेपद
कोल्हापूर (प्रतिनिधी):-इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ गोलफरकाने मात करत विजेतेपद पटकावून फुटबॉल स्पर्धांतील आपले वर्चस्व कायम राखले. या संघाने साखळी सामन्यात नाशिक संघावर २-०, उपउपांत्य फेरीत नांदेड संघावर ४-०, उपांत्य फेरीत मुंबई संघावर २-० गोलफरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी संघात आयुष मोरे, जोतिरादित्य साळोखे, केदार साळोखे, सार्थक सरनाईक, सिध्देश गोरे, सार्थक खाडे, कृष्णा देसाई, साईप्रसाद कापूसकर, समर्थ आडनाईक, अथर्व पाटील, अवधूत चिले, रुद्र जरग, तुषार सावंत, वर्धन कुंभार, सतेज कातवरे, आफान मुल्लाणी या खेळाडूंचा समावेश होता. त्यांना क्रिडा संचालक रमेश पाटील व सहाय्यक प्रशिक्षक अमित पाटील व हर्षवर्धन पाटील यांचे प्रशिक्षण लाभले आणि संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. ‘प्रिन्स शिवाजी’ संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार व संचालक मंडळ यांनी विजयी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.