
no images were found
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सोडलं मौन
प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी कर्नाटकमध्ये प्रचारसभा घेतली होती. भाजपाच्या मित्रपक्षातील उमेदवारावरच इतका गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं आहे.
कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची पंचाईत झाली आहे. याच प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी कर्नाटकमध्ये प्रचारसभा घेतली होती. भाजपाच्या मित्रपक्षातील उमेदवारावरच इतका गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं आहे.