
no images were found
शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि गीता कपूर यांच्याती बहिणींसारखे नाते
कोल्हापूर :- माझ्या जीवनात रक्षा बंधनाचा सण हा मला नेहमीच अपूर्ण वाटायचा. पण, मी जेव्हा सुपर डान्सरमध्ये दाखल झाले, तेव्हा परितोष त्रिपाठीच्या रूपाने मला एक भाऊ मिळाला आणि शिल्पाच्या रूपात एक बहीण देखील मिळाली असल्याचा विश्वास गीता कपूर यांनी व्यक्त केला.
भावुक झालेली गीता कपूर पुढे म्हणाली,“शिल्पा म्हणाली ते अगदी खरं आहे. तुम्ही हा सण आपल्या डान्समधून खूप छान दाखवलात. त्यात छोटे छोटे बारकावे होते, जे शिल्पा आणि माझ्यातील नात्याशी जुळणारे होते.
एखाद्या संस्कृतीची समृद्धी त्यातील सण आणि उत्सवांमधून दिसते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या लोकप्रिय डान्स रियालिटी शोमध्ये या रविवारी ‘त्योहारों का त्योहार’ विशेष भागात भारतातील विविध सणांच्या अशाच समृद्धीचा गौरव करण्यात येणार आहे.
एक अशी बहीण जी भावासारखीच आहे, नेहमी दक्ष असणारी आणि भावनिक दृष्ट्या माझ्याशी कनेक्टेड राहणारी. मला जेव्हा थोडे उदास वाटत असते, तेव्हा इतर कुणालाही नाही, पण शिल्पाला मात्र ते अचूक कळते. कधी कधी मी घरी असताना अचानक तिचा मेसेज येतो,
ती माझी खुशाली विचारते. आणि नेमके त्याच वेळी माझे काही तरी बिनसलेले असते. शिल्पा काही वाचत असते आणि त्यातील एखादे मौलिक वाक्य ती मला सांगते, जे मला त्या दिवशी आवश्यक असलेली ऊर्जा देऊन जाते. असे प्रसंग अनेकदा घडले आहेत. शिल्पा, माझ्या जीवनाचा भाग बनल्याबद्दल तुझे आभार! समर्पण, प्रत्येक एपिसोडनंतर तुझे केवळ डान्सिंगच नाही तर वर्तन देखील अधिकाधिक प्रगल्भ होत चालले आहे. आज मला तुझी अशी एक बाजू दिसली, जी यापूर्वी कधीच दिसली नव्हती. तू एक उत्तम अभिनेता, परफॉर्मर आहेस आणि अर्थात उत्कृष्ट डान्सर आहेस.
समर्पण आणि भावनाचा हा परफॉर्मन्स पाहून भारावून गेलेल्या शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि गीता कपूर या दोघी जणी आपल्या मैत्रीविषयी आणि मैत्रीचे हे नाते ‘सुपर डान्सर’शो मधील सहवासामुळे बहिणी-बहिणीसारखे कसे झाले याविषयी सांगतील.
गीता आणि मी नेहमीच एकमेकींच्या सोबतीला असतो. सुपर डान्सरमध्ये गीताने मला राखी बांधली होती आणि तो माझ्या जीवनातील एक खूप संस्मरणीय क्षण आहे. त्यानंतर या सणाची लक्षणीयता माझ्या दृष्टीने खूपच वाढली. आम्ही दोघी बहिणीच असल्याने हा सण मी साजरा करत नसे, पण आता माझा मुलगा आणि मुलगी यांच्याबरोबर मी हा सण उत्साहाने साजरा करते. ज्यांना बहीणभाऊ आहेत, ते लोक खरोखर नशीबवान असल्या वक्तव्य शिल्पा शेट्टी यांनी व्यक्त केलं.