
no images were found
मोहित मल्होत्रा म्हणतो, “माझ्या पालकांचं स्वप्न मी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साकार करू शकलो, याचा मला आनंद वाटतो!”
‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका प्रसारित झाल्यापासूनच योग्य कारणांमुळे नेहमी चर्चे राहिली आहे. ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या कलाकारांनी, म्हणजेच आपल्या लाडक्या #RishMi यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
अलिकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की ऋषी (रोहित सुचांती) हा विक्रांतचे (मोहित मल्होत्रा) खरे रूप उघड करण्याचा प्रयत्न करताना दिसला. विक्रांतचे लग्न दुसर््या मुलीशी झाले असल्याचे तो पुराव्यासह दाखवून देतो. पण त्याचे खरे रूप उघड करण्यापूर्वीच विक्रांत त्याला जखमी करतो आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. रुग्णालयातही तो आपले खरे स्वरूप उघड करणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी आणि ऋषीचा खून करण्यासाठी विक्रम डॉक्टरचे रूप घेतो.
मालिकेत खलनायकाच्या भूमिकेतील अभिनेता मोहित मल्होत्रा हा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत तो खोटा का होईना, पण डॉक्टर बनल्याने त्याने आपल्या आई-वडिलांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. मोहितने डॉक्टर बनावे, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती, पण मोहितला मात्र अभिनेताच व्हायचे होते. मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी मोहितने आपल्या आईवडिलांची समजूत घातली की अभिनयाच्या क्षेत्रात आपल्याला विविध भूमिका साकारायला मिळतील. आता या मालिकेत एका प्रसंगासाठी मोहित डॉक्टर बनला असल्याने त्याने आपल्या पालकांचे एक स्वप्न वेगळ्या पध्दतीने का होईना, पण साकारले आहे.