
no images were found
विवाहप्रसंगात आशी सिंग सजली सोनेरी रंगात
‘झी टीव्ही’वरील ‘मीत’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. जबाबदारीची कामे देण्यात समाजात होत असलेल्या लिंगभेदाला आव्हान देणार््या मीत (आशी सिंग) या तरुणीची कथा या मालिकेत सादर करण्यात आली असून स्त्री घेऊ शकत नाही, अशी कोणतीही जबाबदारी जगात नाही, हेच त्यातून दाखवून देण्यात आले आहे. मालिकेच्या कथानकाचा काळ अलिकडेच 16 वर्षांनी पुढे नेण्यात आला असून त्यानंतर मीतची मुलगी सुमित (आशी सिंग) ही आपल्या दिवंगत आईप्रमाणेच राहण्याचा प्रयत्न कसा करते, ते दिसते. मालिकेच्या कथानकाला मिळणार््या अनपेक्षित कलाटण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्कंठा कायम राहिली असून आता सुमितचा विवाह शगुनचा (आम्रपाली गुप्ता) मुलगा रौनक (विक्रम बाम) याच्याशी होणार असल्याचे काही नाट्यमय प्रसंग पाहायला मिळतील.
टीव्हीवरील सर्व मालिकांमधील विवाहाच्या प्रसंगांमध्ये प्रेक्षकांचे लक्ष हे नेहमीच वधू आणि तिच्या पोशाखाकडे लागलेले असते. या मालिकेत आशी सिंगच्या चाहत्यांना तिला संपूर्ण सोनेरी रंगाच्या वेशभूषेत पाहता येईल. किंबहुना दोन वर्षांपूर्वी ही मालिका सुरू झाल्यापासून आशी सिंग प्रथमच नववधूच्या वेषात पाहायला मिळणार आहे. या प्रसंगात तिने आपले लांब केस मोकळे सोडले असून त्यावरील प्रतिक्रियेसाठी ती खूपच उत्सुक आहे.
आशी सिंग म्हणाली, “या मालिकेत मी आता तिसर््यांदा वधू बनणार आहे. पण यावेळी मी टॉम बॉय प्रकारची वधू नसून सुमितच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी नेहमीच्या लाजाळू मुलीसारखी वधू असेन. या प्रसंगात माझ्या नववधूच्या पोशाखावर मी खूप खुश झाले आहे. कारण संपूर्ण सोनेरी रंगाचा लेहेंगा आणि त्याच्याशी सुसंगत दागिने लक्षवेधक ठरतील. या पोशाखामुळे सुमितचं सौंदर्य आणि या प्रसंगाची भव्यता अचूक नजरेत भरते. हा अत्यंत सुंदर नववधूचा पोशाख निवडण्यासाठी निर्माते आणि कॉस्च्युम डिझायनर यांनी निश्चितच खास परिश्रम घेतले आहेत. या पोशाखात पारंपरिक ग्लॅमर आणि आधुनिक सफाईदारपणाचा मिलाफ झाला आहे. माझ्या रंगभूषेबद्दल बोलायचं झाल्यास ती सौम्य आणि नैसर्गिक राखण्यात आल्यामुळे त्यात सुमितचं सौंदर्य खुलून दिसतं.”