no images were found
मनसेतर्फे एक सही संतापाची मोहीम सुरू : संपुर्ण शहरात एकच चर्चा
कोल्हापूर :सद्याच्या राजकीय परिस्थितीचा संताप व्यक्त करण्यासाठी मनसे प्रमुख मा. राज ठाकरे यांचे आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण राज्यभर “एक सही संतापाची” अशी स्वाक्षरी मोहीम महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेली आहे. या मोहिमीची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे
या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये करवीर वसियांच्या संतप्त भावना सहीच्या रूपातून व्यक्त करण्यासाठी एक सही संतापाची अशा आशयाचा भला मोठा स्वाक्षरी फलक शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली उभारण्यात आला.
ज्या फलकावर स्वाक्षरी करण्यासाठी करवीर वसयांनी एकच झुंबड गर्दी केली. यावरून करवीरवसियांच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या वर अतिशय संतप्त भावना याठिकाणी व्यक्त होताना दिसून आल्या.
यावेळी बोलताना मनसे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले म्हणाले की, करवीर वासियांचा या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या मनातील संतप्त भावनांना वाट मोकळी करून देणारा आहे. पुढील दोन दिवस अशा पद्धतीचे आणखीन उपक्रम कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
मनसे जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी संतप्त भावना व्यक्त करताना लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या मतदार राजाच्या मतदानाच्या अधिकाराचा गळा घोटण्याचा प्रकार महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांनी करून संयुक्त महाराष्ट्राच्या क्रांतिकारी डौलाला दिल्लीच्या तक्तापुढे झुकवून पाच वर्षासाठी हुकूमशाहीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण केल्याचे भयानक चित्र बघायला मिळत असल्याचा खेद व्यक्त केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील , शहर सचिव निलेश आजगावकर , शहर उपाध्यक्ष सुनील तुपे , जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, विजय करजगार , तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील , नवनाथ निकम, दिलीप पाटील, चंद्रकांत सुगते, अमित बंगे , राजन हुल्लोळी , उत्तम वंदुरे , अभिजीत राऊत , सॅम मुधाळे , राहुल पाटील , सुहास मगदूम , शिवराज भोसले , रत्नदीप चोपडे , तेजस शिंदे, प्रसाद साळोखे , राजू जाधव, सागर साळोखे , मोहसीन मुलानी , सुशांत काकडे , गणेश शिंदे, रणजीत वरेकर , बाजीराव दिंडोर्ले, अजिंक्य शिंदे, शरद जाधव , अमर कंदले, राजवर्धन निकम, राकेश कंदले, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.