no images were found
अॅथलिट बनली अभिनेत्रीः अभिनेत्री अद्रिजा रॉय ही आहे राष्ट्रीय स्तरावरील धावपटू
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’ ही प्रीता (श्रद्धा आर्या), करण (शक्ती आनंद), राजवीर (पारस कलनावट), पाल्की (अद्रिजा रॉय) आणि शौर्य (बसीर अली) यांच्या आयुष्यातील नाट्यमय वळणांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ह्या मालिकेत हल्लीच पाल्कीच्या रूपात प्रवेश केलेली अभिनेत्री अद्रिजा रॉय ही एक सरप्राईज पॅकेज आहे. ती ज्या पद्धतीने आपली भूमिका साकारत आहे केवळ तेच नव्हे तर आपल्याला आयुष्यात खरंच काय करायचे आहे हे तिला कसे कळले यामागची तिची कथाही अतिशय विलक्षण आहे. अद्रिजा पहिल्यापासून अभिनयाच्या जगतातील झगमगाटामध्ये नव्हती. ती एक समर्पित अॅथलिट होती आणि खेल जगतात आपले स्थान बनवण्याच्या आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होती.
अद्रिजा रॉय म्हणाली, “माझ्या आईवडिलांना मला एक अॅथलिट बनवायचे होते. मी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळले असून धावण्यामध्ये मला अनेक पदकेही मिळाली आहे. माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये वार्षिक कार्यक्रम आणि थिएटरमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की मला माझे करिअर अभिनयामध्ये करायचे आहे. मला वाटतं तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. ह्या फेस्टिव्हल्सचा हिस्सा बनताना मला अभिनयातून आनंद मिळतो हे मला जाणवले आणि मग मी अनेक ऑडिशन्स दिल्या. शेवटी त्या छंदाची परिणती उत्कट आवडीमध्ये झाली आणि माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले. माझे आईवडिल आधी खुश नव्हते पण शेवटी त्यांनी माझा हा निर्णय स्वीकारला. आपले स्थान जिथे असते तिथे आयुष्यच आपल्याला घेऊन जाते. कोलकात्यावरून मुंबईला येण्याचा निर्णय कठीण होता. पण ज्याचा शेवट चांगला होतो, ते चांगलेच असते.”
ती पुढे म्हणाली, “माझ्या आईवडिलांना मला अॅथलिट बनवायचे होते, पण आता मला एका अभिनेत्रीच्या रूपात आणि ‘कुंडली भाग्य’मध्ये पाल्कीची भूमिका साकारताना पाहूनही ते खूप उत्साहात आहेत. माझ्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठीची ही पायरी असून माझा प्रवास ज्याप्रकारे उलगडत आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे.”