no images were found
वार्षिक प्रशिक्षण शिबिरासाठी दरपत्रक सादर करावेत
कोल्हापूर (प्रतिनिधी): 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, कोल्हापूर मार्फत माहे जून 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत एन.सी.सी.भवन, शिवाजी विद्यापीठ आवार कोल्हापूर या ठिकाणी वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिदिन सकाळी न्याहरी, चहा बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा बिस्कीट, जेवण असे अन्नश्रेणी यादी (मेनू) नुसार पुरवठा करण्यासाठी (प्रत्येक व्यक्ती प्रती दिन) खर्चाचे दरपत्रक दिनांक 18 जून 2024 पर्यंत समादेशक अधिकारी 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी.भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे पाठवावीत, असे आवाहन कमांडींग ऑफिसर यांनी केले आहे.
प्रतिदिन अन्नश्रेणी यादी (मेनू) या कार्यालयाकडून प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत प्राप्त होईल.
वर्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 313- कालावधी 29 जून ते 8 जुलै 2024 भाग घेणाऱ्या छात्रांची संख्या- 455, वर्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 323 (थलसेना शिबीर) – कालावधी 10 ते 19 सप्टेंबर 2024 भाग घेणाऱ्या छात्रांची संख्या- 455, वर्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 325 (थलसेना शिबीर) – कालावधी 20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 भाग घेणाऱ्या छात्रांची संख्या- 455, वर्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 326 – कालावधी 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2024 भाग घेणाऱ्या छात्रांची संख्या- 455, शिवाजी पदभ्रमंती प्रशिक्षण शिबिर क्र. 331- कालावधी 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2024 भाग घेणाऱ्या छात्रांची संख्या- 101 असून सर्व शिबिरासाठी प्रतिदिन सकाळी न्याहरी, सकाळी चहा बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा बिस्कीट, संध्याकाळी शाकाहारी व मांसाहारी जेवण प्रति दिन, प्रती व्यक्ती दर याप्रमाणे राहिल.