
no images were found
दरोगा हप्पू सिंग अडकला दुहेरी संकटात!
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’ दरोगा हप्पू सिंगच्या (योगेश त्रिपाठी) विनोदी खोडकरपणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरोगा हप्पू सिंगला पती, मुलगा आणि नऊ खोडकर मुलांचे वडिल म्हणून स्वत:च्या जीवनात संतुलन राखताना संघर्ष करावा लागत आहे. त्याची प्रबळ इच्छाशक्ती असलेली पत्नी राजेश (गीतांजली मिश्रा) आणि शिस्तबद्ध आई कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) यांच्यादरम्यान अडकलेल्या हप्पूचे जीवन आधीच गोंधळलेले आहे. पण त्याची सासू अवधेशियाच्या आगामनासह स्थिती अधिक नियंत्रणाबाहेर जाणार आहे. उर्मिला शर्मा अवधेसियाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेमधील आपल्या प्रवेशाबाबत सांगताना उर्मिला शर्मा ऊर्फ अवधेसिया म्हणाल्या, ”हप्पूला स्वप्न पडते की, त्याची सासू अचानक त्याच्या घरी आली आहे. तो या स्वप्नाबाबत कटोरी अम्मा आणि राजेशला सांगतो, तेव्हा त्या दोघींच्या प्रतिक्रिया एकमेकींच्या विरूद्ध असतात. अवधेसिया आवडत नसल्याने कटोरी अम्मा चिडचिड करते, तर राजेशला खूप आनंद होतो, कारण तिचा विश्वास असतो की पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात. कटोरी अम्मा त्या स्वप्नाची थट्टा करू लागते, हप्पू नकळतपणे तिला पाठिंबा देतो, ज्यामुळे राजेश नाराज होते. पण त्यांच्या भावना बदलून जातात, जेथे माझी व्यक्तिरेखा त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते आणि सर्वांना धक्का बसतो. माझ्या आगमनाने हप्पूच्या संकटात भर पडते. कटोरी अम्मा व अवधेसिया सतत भांडतात, ज्यामुळे हप्पूचे जीवन अधिक असह्य होऊन जाते.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, ”राजेशला उत्साहित करण्यासाठी हप्पू त्याचा जिवलग मित्र बेनीच्या (विश्वनाथ चॅटर्जी) मदतीने तिच्यासाठी गाणे गात रोमँटिक गेस्चरची योजना आखतो. बेनी गातो, तर हप्पू त्याच्याशी अचूक लिप-सिंक करतो, जे पाहून राजेश खूप प्रभावित होते. ती कमिशनरसमोर (किशोर भानुशाली) त्याच्याबाबत बढाई मारते, ज्यामुळे कमिशनर हप्पूला बढती देण्याच्या बदल्यात त्याच्या जुन्या मैत्रिणीचे लक्ष वेधून घेण्यासाठी हप्पूच्या ‘गायन कौशल्यांचा’ वापर करण्याचे ठरवतो. हप्पूला सर्वकाही नियंत्रणात असल्यासारखे वाटत असतानाच संकट ओढवते. अवधेसियाने दिलेले औषधी उपचार केल्यानंतर बेनीचा आवाज जातो. ती ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते, ज्यानंतर बेनीचा आवाज पुन्हा येतो. पण यावेळी त्याचा आवाज ओरडणाऱ्या गाढवासारखा असतो (हसतात). खरी धमाल आता सुरू होते. घरामध्ये अवधेसिया असल्यामुळे दररोज नवीन ड्रामा व अविरत हास्याचा आनंद मिळेल.”