
no images were found
‘मुद्रा योजने’ची दशकपूर्ती कौतुकास्पद-हेमंत पाटील
पुणे, : आंतरराष्ट्रीय दर्जा आणि मानके पूर्ण करणारी एक भक्कम आर्थिक प्रणाली उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव प्रयत्नरत असतात. सामाजिक समरसतेचे ध्येय समोर ठेवून समाजातील सर्वात खालच्या स्तरातील लोकांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या प्रगती करण्याची संधी देण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ला १० वर्ष पूर्ण झाली आहे. ही योजना देशाचा आर्थिक कणा मजबूत करणारी आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.९) व्यक्त केले.
विशेष म्हणजे दशकभरात ३३ लाख कोटींहून अधिक ५२ कोटींपेक्षा जास्त तारणविरहित कर्जे सरकारने लाभार्थ्यांना दिली आहेत. कौतुकास्पद बाब म्हणजे यातील ७०% कर्ज केवळ महिलांना, तर ५०% कर्जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीयांना देत सरकारने त्यांना आर्थिक सक्षम केले.ही बाब वंचित घटकांच्या विकासाकरीता मोदी सरकारची कटिबद्धता दाखवून देणारी असल्याचे पाटील म्हणाले.
रोजगार निर्मितीत देखील योजनेची कामगिरी विशेष उल्लेखनिय आहे.योजना सुरू झाल्याच्या पहिल्या तीन वर्षात १ कोटींपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण करण्यात सरकारला यश मिळाले. बिहार सारखे राज्य योजनेत आघाडीवर आहे.पहिल्यांदा उद्योग सुरू करणाऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी १० लाख कोटींची तरतूद सरकारने केली.मदतीचा हा ओघ भविष्यातही सुरू राहील.विशेष म्हणजे लहान व्यवसायांसोबत निमशहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य लोकांसाठी स्वयंरोजगार, स्वावलंबनाचा स्त्रोत सरकारने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी करीत उभारला आहे, असा दावा देखील पाटील यांनी केला.