Home राजकीय “देश तुमच्यामुळे सुरक्षित आहे”: अमित शहा

“देश तुमच्यामुळे सुरक्षित आहे”: अमित शहा

10 second read
0
0
39

no images were found

“देश तुमच्यामुळे सुरक्षित आहे”: अमित शहा

        

केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी त्यांच्या तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यादरम्यान कठुआ येथील ‘विनय’  बॉर्डर चौकीला भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधला. भारताच्या सीमा आणि सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी कटिबद्ध असलेले शहा यांनी ‘विनय’ सीमा चौकीवरील आपल्या भेटीत धाडसी जवानांना स्पष्ट संदेश दिला कि “तुम्ही सीमेवर तैनात आहात म्हणून कोट्यवधी नागरिक शांत झोपू शकतात. देश तुमचा ऋणी आहे आणि सदैव ऋणी राहील.”

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार सुरक्षा दल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. देशकर्तव्यावर असताना जवानांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी सीमा भागात इलेक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणा, अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी, आणि बोगदे शोधून काढण्याची प्रणाली लावण्यात येत आहेत. हे तंत्रज्ञान संपूर्ण सीमाभागात लागू झाल्यानंतर संभाव्य धोक्यांवर तात्काळ कारवाई करणे आणि प्रतिरोध करणे सोपे होणार आहे.

संपूर्ण देश जाणतो की भयंकर थंडी असो, मुसळधार पाऊस, 45 अंश सेल्सियसची उन्हाळी झळ असो किंवा कठीण भूभाग — अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपले जवान सीमेवर सतर्क राहून कर्तव्य बजावत आहेत. या प्रसंगी अमित शहा यांनी सीमाभागात 47.22 कोटी किमतीच्या नव्याने बांधलेल्या पायाभूत सुविधांचे उद्घाटन केले, ज्यामध्ये आठ महिला बॅरेक, हाय-मास्ट लाइट्स, जी+1 टॉवर्स आणि एक संयुक्त सीमा चौकी यांचा समावेश आहे.

अमित शहा यांचे दहशतवादाबाबतचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आणि जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे परिणाम आधीच दिसून आले आहेत. त्यांनी खोऱ्यात पाऊल ठेवताच हुर्रियतला मोठा धक्का बसला, कारण जम्मू आणि काश्मीर इस्लामिक पॉलिटिकल पार्टी, जम्मू आणि काश्मीर मुस्लिम डेमोक्रॅटिक लीग आणि काश्मीर फ्रीडम फ्रंट या तीन संघटनांनी हुर्रियतपासून वेगळे होण्याची घोषणा केली. हे काश्मीरमधील लोकांचा भारतीय संविधानावर वाढता विश्वास दर्शवते. पंतप्रधान मोदींच्या एकसंघ आणि बळकट भारताच्या दृष्टिकोनाला अजून बळ मिळाले असून, अशा एकूण ११ संघटनांनी आता अलगावादाचा मार्ग सोडून राष्ट्रीय एकतेला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

‘अंत्योदय’ च्या आपल्या संकल्पनेप्रमाणे अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये पोहोचताच पुन्हा एकदा एक अनुकरणीय परंपरा जपली. त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या १२ महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाइकांना त्यांनी वैयक्तिकरित्या भेटून केवळ संवेदना व्यक्त केल्या नाहीत, तर सरकार प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन दिले.

अमित शहा यांच्यासारखा गृहमंत्री देशाला लाभणे हे देशाचे भाग्य आहे, कारण त्यांचा विश्वास आहे की शहीद हा केवळ एका कुटुंबाचा मुलगा नसतो, तो संपूर्ण देशाचा मुलगा असतो. या भावनेमुळे कोणत्याही शहीदाचे बलिदान वाया जाणार नाही. या प्रसंगी अमित शहा यांनी नऊ शहीद जवानांच्या कुटुंबीयांतील पात्र व्यक्तींना नियुक्तीपत्रे देखील दिली.

या तीन दिवसीय जम्मू आणि काश्मीर दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. विकास प्रकल्पांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी या बैठका घेण्यात आल्या.

काश्मीरचा चेहरा-मोहरा बदलणारे अमित शहा यांचा हा दौरा केवळ राजकीय किंवा प्रशासकीय नाही, तर तो एका सैनिकाच्या खांद्यावर ठेवलेला विश्वासाचा हात आहे

 

Load More Related Articles

Check Also

अहमदाबाद येथील अदानी विद्या मंदिर देशातील अव्वल शाळांमध्ये सीबीएसई बारावीचा 100% निकाल, 

अहमदाबाद येथील अदानी विद्या मंदिर देशातील अव्वल शाळांमध्ये सीबीएसई बारावीचा 100% निकाल,&nb…