no images were found
शालेय विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी (NEP) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअतर्गत विद्यापीठाशी कनेक्ट व्हावे “- अधिष्ठाता प्रा डॉ एम एस देशमुख
कोल्हापूर (प्रतिनिधी): क्रीडा अधिविभागामार्फत NEP स्कुल कनेक्ट मोहिमेअंर्तगत दि. 11 जून 2024 रोजी दु. 03.00 ते 05.00 यावेळेत “Recent Trends in Physical Education & Career Opportunities in Sports” या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आधिष्ठाता, मानव्यशास्त्र विद्याशाखा मा. डॉ. एम. एस देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, डॉ. टी. एन. चौगुले, विद्यार्थी विकास संचालक, डॉ पी. टी. गायकवाड, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पवार, सौ.मनिषा शिंदे , विजय रोकडे,श्री विजय मलगे, श्री प्रकुल मंगोरे पाटील , अभजित मस्कर, कृष्णाथ पाटील, श्री जालंधर मेढे उपस्थित होते. उदघाटन समारंभाचे प्रस्तावीक क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांनी केले आणि विद्यापीठामार्फत खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा आणि होतकरू खेळाडूंना विविध आर्थिक योजना याची माहिती दिली. डॉ देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे मार्गदर्शनकरीत , शालेय विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी कनेक्ट होवून विविध क्षेत्रामध्ये संशोधन, शैक्षणिक, क्रीडा, कला इत्यादी क्षेत्रामध्ये उज्वल भविष्य घडवावे. या कार्यशाळेसाठी कोल्हापुर जिल्हातील विविध कोचींग सेटरचे मार्गदर्शक, खेळाडू व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्री अथर्व देवण्णावर यांनी स्ट्रेंथ अॅड कडिशनिंग या विषयावर तसेच दुस-या सत्रामध्ये डॉ सुशांत मगदूम यांनी खेळातील करियरच्या संधी या विषयावर उपस्थिाताना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. किरण पाटील व श्री. सुचय खोपडे यांनी केले. सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व क्रीडा अधिविभागाच्या सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.