Home मनोरंजन आंगन – अपनों का’ मालिकेत जयदेवचे  गुपित पल्लवीने केले उघड

आंगन – अपनों का’ मालिकेत जयदेवचे  गुपित पल्लवीने केले उघड

2 second read
0
0
31

no images were found

आंगन – अपनों का’ मालिकेत जयदेवचे  गुपित पल्लवीने केले उघड

एक समर्पित पिता जयदेव शर्मा (महेश ठाकूर) आणि त्याच्या तीन मुलींशी असलेले त्याचे दृढ नाते दर्शविणारी सोनी सबवरील मालिका ‘आंगन – अपनों का’ प्रेक्षकांना आवडते आहे. अलीकडच्या भागांमध्ये जयदेव आपली मुलगी पल्लवी (आयुषी खुराना) हिला मोकळीक मिळावी म्हणून सिमल्याला ऑरगॅनिक शेती करायला जात असल्याचे सांगून आकाश (समर विरमानी)च्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायचे ठरवतो. आपल्या तिन्ही मुलींना तो तसे सांगतो. त्यावर बराच वाद होतो आणि पल्लवी हारून आपल्या सुन्या सुन्या झालेल्या घरी परतते. तिच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते.

आगामी भागांमध्ये, जयदेव आकाशला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी मस्त, स्वादिष्ट पराठे डब्यात घालून देतो पण पराठ्याचा एक तुकडा तोंडात टाकताच पल्लवी आपल्या वडिलांच्या हाताची चव ओळखते. तन्वी (अदिती राठोड) आणि दीपिका (नीता शेट्टी) ला घेऊन ती आकाशच्या घरी जाऊन धडकते आणि जयदेवचे असत्य उघडकीस आणते. त्यांच्यात खूप बोलाचाली होते आणि पल्लवी रागावून तिथून निघून येते. पल्लवीच्या मनात भावनांचा कल्लोळ माजतो. कारण, जयदेवचे अनपेक्षित वागणे तिने कसेबसे स्वीकारलेले असते पण आता तिला त्यामागचे कारण उमगले आहे.

पल्लवी शर्माची भूमिका साकारणारी आयुषी खुराना म्हणते,“पल्लवी एक समजूतदार मुलगी आहे आणि जोपर्यंत तिला सत्य माहीत नसते, तोपर्यंत तिला आपल्या वडिलांची खरोखर काळजी वाटत असते. इतर मुलांप्रमाणेच ती देखील आपल्या वडिलांनी केलेल्या पदार्थाची चव तत्काळ ओळखते. जयदेव हा आकाशच्या घरी राहत असल्याचे सत्य उघडकीस येते, तो क्षण जयदेव आणि पल्लवीच्या नात्यातील टर्निंग पॉइंट ठरतो. ते दोघे एकमेकांशी खूप वाद घालतात. ही कथा कुठेतरी त्यांच्या नात्यातील गुंतागुंत सोडवेल आणि मग जयदेवला हे लक्षात येईल की, आपण पल्लवीवर भार नाही आहोत, तर तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहोत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…