no images were found
कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी बनले सिक्रेट सांता!
नाताळ सण जवळ आला असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे आणि सिक्रेट सांतासाठी उत्सुकतेमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे उत्सवाच्या उत्साहामध्ये अधिक आनंदाची भर होत आहे. एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी सिक्रेट सांता बनण्याच्या त्यांच्या खास योजनांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत व्योम ठक्कर (अटल बिहारी वाजपेयी, ‘अटल’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’). एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणारा व्योम ठक्कर म्हणाला, ”मला सांताक्लॉज खूप आवडतो. तो सरप्राइज गिफ्ट्स देत लोकांना आनंदित करतो. मला त्याच्यासारखे व्हायचे आहे, त्याचा पोशाख परिधान करायचा आहे आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. योगायोगाने अटलजींचा वाढदिवस नाताळ सणादरम्यान असल्यामुळे मी खास पद्धतीने तो क्षण साजरा करणार आहे. मी सेटवर सांता सारखा पोशाख घालणार आहे आणि प्रत्येकाच्या रूममध्ये सरप्राइज गिफ्ट्स ठेवणार आहे. मी त्यांना यंदा सांताकडून काय पाहिजे याबाबत विचारत आहे (हसतो). काही लोकांना माझ्या योजनांबाबत समजले आहे, पण मी ते सरप्राइज ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आशा करतो की, हे सिक्रेट सांता मिशन सेटवर अनेक उत्साह व आनंद घेऊन येईल.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”अनेक वर्षांपासून मी माझ्या पुतण्यांसाठी सिक्रेट सांता आहे. ते दरवर्षी माझ्या सिक्रेट सांता सरप्राइजेज वाट पाहत असले तरी त्यांचे स्पेशल गिफ्ट्स भेटल्यानंतर खूप आनंदित होतात. गिफ्ट्स पाहून त्यांच्या डोळ्यांमधील आनंद पाहण्याचा क्षण अत्यंत उत्साहपूर्ण आहे. मी यापूर्वी सांताचा पोशाख परिधान केलेला नाही, ज्यामुळे मी यंदा तो पोशाख परिधान करण्याचा विचार करत आहे, कदाचित मी त्यामध्ये मोहक दिसेन (हसते). यंदा नाताळला मी त्यांना दीर्घकाळापासून वाट पाहत असलेले प्लेस्टेशन गिफ्ट देणार आहे, ज्यामुळे ते एकत्र धमाल करू शकतील. मी यंदा नाताळला सर्वांना त्यांच्या प्रियजनांसाठी सांता बनण्याचे आवाहन करते. आपल्या प्रियजनांना आनंदित केल्याने खूप आनंद व समाधान मिळते.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, ”नाताळचे माझ्या मनात खास स्थान आहे आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत नाताळ सण साजरा करण्याचा आनंद घेते, चर्चमध्ये जाते आणि रेस्टॉरंट्समध्ये वाइन केक सारख्या स्वादिष्ट फूडचा आस्वाद घेते. पण, यंदा माझ्या नाताळ सण साजरा करण्याच्या योजनांमध्ये काहीसा बदल आहे. मी माझ्या नवजात मुलीसोबत नाताळ सण साजरा करणार आहे. मी तिला सांतासारखा पोशाख परिधान करणार आहे. ती गिफ्ट्स वाटण्यासाठी खूप लहान आहे, ज्यामुळे मी तिच्यावतीने आमच्या प्रियजनांना गिफ्ट्स वाटणार आहे. मी शॉपिंग व गिफ्ट्स रॅपिंग पूर्ण केले आहे आणि आता प्रियजनांना सरप्राइज गिफ्ट्स मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहे.”