no images were found
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात ६० वर्षीय साधूची हत्या
राजस्थान (जि. धौलपूर) येथील नदीपात्रात एका साधूचा मृतदेह सापडल्याची घटना घडली. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी (आज) सकाळी कांचनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणी जंगलात नदीच्या काठावर एका ६० वर्षीय साधूचा मृतदेह आढळला.
बहाबुद्दीन खान (रा. भीमगढ गाव) या साधूची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे पोत्यांत भरण्यात आले होते. मृत साधू गावचा रहिवासी आहे. गेल्या 10 वर्षांपासून तोंत्री गावातील मातेच्या मंदिरात हा साधू पूजा करत होता. या घटनेची माहिती मिळताच कांचनपूर पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान एफएसएलच्या पथकासही घटनास्थळी दाखल करण्यात आलेले आहे. अधिक माहिती गोळा केली जातेय.
या मयत साधूने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता आणि गेल्या १० वर्षांपासून तो चामुंडा मातेच्या मंदिरात वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार येथे नमाज पठण करण्यासोबत मंदिराची देखभालही तो करीत असे. आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांन रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत चार पोत्यांमध्ये एक मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजून मोठ्याप्रमाणात गावकरी जमून त्यांनी पोलिसांना माहिती कळविली. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा सुगावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.