
no images were found
जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला घवघवीत यश
जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला घवघवीत यश, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन : राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, (कॅबिनेट मंत्री दर्जा) राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि उपाध्यक्ष, महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रांन्सफॉर्मशेन, महाराष्ट्र राज्य
गेल्या सहा महिन्यापूर्वी राज्यामध्ये झालेल्या घडामोडीनंतर प्रथमच राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका आज पार पाडल्या. संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये परत एकदा युती ही “नंबर एक” असल्याचे सिध्द झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण युतीच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे अभिनंदन. खरं म्हणजे अचानक राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पहिलीच निवडणूक असताना देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी कष्ट घेतले आणि ही निवडणूक जिंकून दाखवली याबद्दल सर्वच शिवसैनिकांचे मन:पूर्वक अभिनंदन. येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील, विविध सोसायटी असतील, सहकारी संस्था असतील, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल या निवडणुका आपल्याला युती म्हणून मोठ्या ताकतीने जिंकायच्या आहेत आणि आपण ताकतीने या निवडणुकांसाठी तयार रहावे एवढीच याठिकाणी विनंती करतो. जिल्ह्यामध्ये मिळालेल्या यशाबद्दल आपल्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. येणाऱ्या विधानसभा, लोकसभेसाठी देखील जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन ही श्री राजेश क्षीरसागर यांनी केले.