
no images were found
औरंगाबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
औरंगाबाद : एकाच दिवशी औरंगाबाद शहरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्याचे समोर येतेय. याबाबत समजलेले माहिती अशी की, वाळूज औद्योगिक नगरीमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत शाळेतून १०वीच्या अल्पवयीन मुलीस ढाब्यावर नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तर दुसऱ्या एका घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ती घरी एकटी असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला घरातून कपाशीच्या शेतात ओढत नेत बलात्कार करण्यात आला. दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
वाळूज औद्योगिक नगरीतील शाळेत १०वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील ढाब्यावर नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदरील प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवा चौधरी याला पोलिसांनी अटक केली. तसेच दुसऱ्या घटनेत आरोपीने घराच्या पाठीमागील बाजूने येऊन पाणी पिण्याचा बहाणा करीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. रमेश येडूबा मोरे असे या संशयित आरोपीचे नाव असून दोघांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही घटनेमधील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे.