
no images were found
यात्री निवास/लॉजिग – बोर्डीग व्यवसायीकांनी येत्या 7 दिवसात महानगरपालिकेचा परवाना घ्यावा
कोल्हापूर : शहरातील यात्री निवास/लॉजिग बोर्डीग व्यवसायीकांनी येत्या 7 दिवसात महानगरपालिका परवाना विभागाकडे रितसर अर्ज करुन परवाने घ्यावेत. अन्यथा महापालिका परवाना विभागाच्या वतीने तपासणी करतेवेळी विनापरवाना लॉजिंग-बोर्डींग व यात्री निवास सुरु असलेचे आढळलेस अशा व्यवसायीकांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरामध्ये सुरु असणारे लॉजिंग बोर्डींग व यात्री निवास यांची महानगरपालिका परवाना विभागाकडून मागील काही दिवसापुर्वी तपासणी केली होती. त्यामध्ये परवाना नसलेले त्यावेळी सदचे यात्री निवास सिल करण्यात आले होते. या व्यवसायीकांच्या सोईसाठी महापालिकेने परवाना नसणारे यात्री निवास व्यवसायीकांकरीता 2 दिवसांचा विशेष कॅम्प घेऊन परवाने देणेची कार्यवाही केली होती. परंतु या कॅम्पला ब-याच यात्री निवास व्यवसायीकांनी भेटी दिल्या. परंतु पुढील कोणतीही पुर्तता करुन घेतली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी अजूनही विनापरवाना लॉजिग-बोर्डींग व यात्री निवास सुरु असलेचे निदर्शनास येत आहे. तरी अशा सर्व व्यवसाईकांनी सात दिवसात रितसर परवाना घेऊन त्यांच्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.