
no images were found
विधानसभा अध्यक्षांचे वर्तन निपक्षपाती असावे-हेमंत पाटील
विरोधकांनाही योग्य संधी देण्याची आवश्यकता
मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर नागपूरमध्ये होत आहे.विरोधकांनी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना विविध मुद्दयांवर घेरण्याची पुर्ण तयारी केली आहे. सभागृहाच्या कामकाजात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना योग्य न्याय देण्याची जवाबदारी त्यामुळे विधानसभा अध्यक्ष तसेच विधान परिषदेच्या सभापतींचे असते.पंरतु, अध्यक्ष आणि सभापती सभागृहातील सदस्यांमधूनच निवडले जात असल्याने पक्षासोबत असलेल्या बांधिलकीमुळे ते निपक्षपाती काम करू शकत नाहीत. अशात विरोधकांच्या मुद्द्यांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कायदेमंडळाच्या पंरपरेचा आदर करीत सभापती, अध्यक्षांनी निपक्षपातीपणे काम करावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी केले
विविध विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांकडून विविधमंडळात प्रश्न उपस्थित केले जातात.पंरतु, या प्रश्नांचे उत्तर सभागृहात दिल्यानंतर पुढे त्यावर योग्य कारवाई केली जात नाही,असा दावा देखील पाटील यांनी केला.विधिमंडळातच जर राज्यातील समस्या, तक्रारीकडे योग्य लक्ष दिले जात नसेल तर मुंबई आणि नागपूरातील अधिवेशनला अर्थ उरत नाही, अशी खिन्न भावना देखील पाटील यांनी व्यक्त केली.
आमदारांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नांची, पुरवणी मागण्यांची तात्काळ दखल घेत मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत येत असलेल्या विषयांची सोडवणूक करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.विरोधकांनी देखील सत्ताधारी आमदारांसोबत जुळवून घेत राज्यातील जनतेच्या भल्यासाठी सभात्याग न करतात चर्चेत सहभागी होवून सकारात्मकरीत्या विविध मुद्यांवर सरकारला घेरले पाहिजे.नागपूरच्या अधिवेशनात आमदार केवळ सहलीसाठी येतात, अशी जनमानसात निर्माण झालेल्या धारणेला त्यामुळे तडा बसेल,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.