Home सामाजिक उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

0 second read
0
0
83

no images were found

उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

पुणे येथे होणार वितरण

हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची राज्य बहुभाषीक भाऊबाबा वंजारी संघाच्या वतीने प्रशासकिय व सामाजिक कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बुधवारी (ता.10) पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतीक भवनात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले गणेश वाघ यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हयातील संपूर्ण 1010 अंगणवाडया एकसमान रंगाने रंगवून अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या केल्या. राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे. या शिवाय जिल्हयातील बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी आरोग्य विभागाच्या समन्वयातून ग्राम बालविकास केंद्रे सुरु करून बालकांचे श्रेणीवर्धन केले आहे. सध्या पावसाळ्यात अंगणवाडीतील बालके व गरोदर, स्नतदा मातांना पुरक पोषण आहार मिळालाच पाहिजे यासाठी त्यांनी नियोजन केले. त्यामुळे अतिवृष्टीनंतरही एकही लाभार्थी पोषण आहारापासून वंचित राहिलेला नाही.

या शिवाय लोकसहभागातून अंगणवाड्या डिजीटल केल्या आहेत. बहुतांश अंगणवाड्यातून दुरचित्रवाणी संचाच्या माध्यमातून बालकांना आकार हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. या शिवाय आधारकार्ड नसलेल्या सुमारे 30 हजार लाभार्थ्यांची 15 दिवसांत नोंदणी केली आहे. त्यांच्या कार्याबद्दल जिल्हा परिषदेने त्यांचा उत्कृष्ठ अधिकारी म्हणून सत्कार केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…