गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळे सोन्याचे दागिने लंपास कोल्हापूर : सणासुदीमध्ये चोरटे आपले हात साफ करताना दिसत आहेत. मालेगावमध्ये अशीच एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळ्यांचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. पन्हाळा तालुक्यातील मालेगावात ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घरातील लोक झोपेत असताना चोरट्यानी कडी कोयंडा उचकटला आणि घरात प्रवेश केला. …