no images were found
ना. चंद्रकांत पाटील यांच्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : अणुकंपा तत्वावरील काम रखडल्यामुळं कोल्हापूरात तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या समोर या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर हा सर्व प्रकार घडला. धरणगुत्ती इथल्या संतोष राजू कांबळे या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अणुकंपाच काम होत नव्हंत म्हणून त्याने हे पाऊल उचलल आहे. या व्यक्तीला पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. 2007 वर्षापासून हे काम होत नसल्यामुंळ हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये अनुकंपा खाली भाऊजींना नोकरीस घेत नसल्याच्या कारणावरून आज संतोष राजू कांबळे (रा. दानोळी, ता. शिरोळ) याने जिल्हा अधिकारी यांच्या दालना बाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सुद्धा तेथे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या दालना बाहेर असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी राजू भालचिम आणि दिलीप वडर यांनी संतोष च्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतल्यामुळे हा अनर्थ टळला. पोलीस उपनिरीक्षक गजानन परीट यांनी तातडीने संतोषला पकडून तेथून बाहेर आणले. शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती श्री परीट यांनी दिली.