
no images were found
गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक
मुंबई : विलेपार्ल्यातल्या दहीहंडीत सातव्या थरावरून पडून संदेश दळवी या युवकाचा मृत्यू झाला होता. कुर्ल्यातील संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता. याप्रकरणी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख (36) याला अटक करण्यात आली आहे. गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप रियाझ शेख यांच्यावर करण्यात आला आहे. सुरुवातीला शेखवर मानवी जीवन धोक्यात कलम ३३६ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्यूनंतर ३०४ (अ) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीहंडीचे आयोजन करताना आयोजकांनी गोविंदा पथकाची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती आयोजकांना पोलिसांकडून देण्यात आली होती. या प्रकरणी दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप रियाझ शेख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शेखने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्याने दळवी यांचा मृत्यू झाला तर दुसरा अद्याप कूपर रुग्णालयात दाखल आहे. सुरुवातीला शेखवर मानवी जीवन धोक्यात कलम ३३६ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्यूनंतर ३०४ (अ) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.