no images were found
गडचिरोलीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. येथील अतिसंवेदनशील अशा हेटी परिसरातील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून पोलीसांकडून तब्बल 32 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
माओवाद्याची सतत कारवाई सुरू असलेल्या भागात ही रक्कम आढळल्याने पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. हेटी येथील साईनाथ कुमरे याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. याबाबत पोलिसांना एका पोत्यात रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला. त्यात पाचशे रुपयापासून 100 ते 200 आणि 50 च्या नोटांचे बंडल सापडले आहेत. अंदाजे 32 लाख रुपये रक्कम आहे. मात्र ही रक्कम सट्टापट्टीच्या व्यवसायातून कमावल्याची कबुली संबंधित व्यक्तीने दिली. हा परिसर माओवादप्रभावीत असल्याने पोलीसांनी ही रक्कम जप्त करुन आयकर विभागाला याबद्दलची माहीती कळविली असून यानंतर पुढील चौकशी होईल. पोलीसांकडून रक्कम जप्त करुन सील करण्यात आली आहे.