no images were found
पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, व्यावस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. पवन गायकवाड, डॉ. एस.टी. कोंबडे, आनंद खामकर, डॉ. प्रमोद पांडव आदी उपस्थित होते.