Home गुंतवणूक डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ योजनेचा शुभारंभ

डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ योजनेचा शुभारंभ

34 second read
0
0
35

no images were found

 डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ योजनेचा शुभारंभ

मुंबई: डीएसपी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ या नवीन फंडाचा शुभारंभ करत असल्याची आज घोषणा केली. हा फंड भारतातील पहिला फ्लेक्सी कॅप एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आहे. हा फंड ईटीएफ निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० टीआरआय* या निर्देशांकानुसार आपली वाटचाल करणार आहे. हा निर्देशांक मानक बिंदू असून ईटीएफ फंड त्याच्या आधारे दर्जेदार व्यवसायांवर लक्ष केंद्रित करताना लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गतिमान पध्दतीने गुंतवणूक करणार आहे.

      भारतीय शेअर बाजार अनेकदा प्रवाहानुसार सतत चढउतार दर्शवतो. या प्रवाहामध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कंपन्या टप्प्याटप्यात चांगली कामगिरी करतात. परंतु बहुतांश गुंतवणूकदारांसाठी, कोणत्या समभागामध्ये गुंतवणूक करायची, किती निधी गुंतवायचा आणि समभागातून केव्हा आपली गुंतवणूक इतरत्र वळवायची, हे ठरविणे अतिशय कठीण असते. परंतु त्याचबरोबर खूप खर्चिकही असते.

        ही गुंतागुंत ईटीएफ फंड सहज दूर करतो. मिड आणि स्मॉल कंपन्यांचे समभाग वेगाने वाटचाल करत असताना फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड अतिशय पारदर्शक पध्दतीने आणि नियमांच्या चौकटीत या समभागांमधील गुंतवणूक स्वयंचलित पध्दतीने वाढवत जातात. जेव्हा हे समभाग शिखर पातळीवर पोहचतात, त्यावेळी या समभागांमधील गुंतवणूक काढून ती लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतविली जाते.  समभागांच्या निवडीसाठी अतिशय कठोर निकष वापरले जातात. त्यामुळे मूलभूतपणे अतिशय मजबूत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदाराचा निधी राहील, याची शाश्वती यातून मि‌ळते.

       ऑक्टोबर २००९ मध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० निर्देशांकाने १७.६ टक्के** चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे. शेअरबाजाराच्या विविध प्रवाहांमध्येसुध्दा या निर्देशांकाने निफ्टी ५०० टीआरआय या निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी बजावलेली आहे. गतिमान वाटपासोबत गुणवत्तेवर केंद्रीत केलेले लक्ष आणि निर्देशांकात समाविष्ट असलेल्या केवळ ३० समभागांच्या आधारे पोर्टफोलिओची उभारणी या दोन घटकांच्या संयोजनामुळे हा निर्देशांक शक्तीशाली बनला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मंदीच्या काळातही या निर्देशांकाने गुंतवणूकदारांना फारशी झळ पोहचू दिलेली नाही – उदाहरणार्थ, २०११ आणि २०१८ मधील अभूतपुर्व घसरणीवेळी हा निर्देशांक व्यापक बाजाराच्या तुलनेत कमी प्रमाणात घसरला. तसेच २०२० च्या कोविड घसरणीदरम्यानही या निर्देशांकाने आपले नुकसान मर्यादित ठेवले आणि त्यानंतर बाजार सावरताच पुन्हा वेगाने उसळी घेतली.

       नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गुंतवणूकीसाठी खुली राहणार आहे. गुणवत्तेच्या शिस्तीबरोबरच अप्रत्यक्ष पध्दतीने (पॅसिव्ह) आणि कमी खर्चात केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीतून मिळणारी कार्यक्षमता सातत्याने राखत शेअरबाजारातील विविध प्रवाहांदरम्यान संधी हेरणाऱ्या सोयीस्कर गुंतवणूक पर्यायाच्या माध्यमातून दीर्घकाळात भांडवलवृध्दी हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा ईटीएफ फंड प्रामुख्याने साकारण्यात आलेला आहे.

      नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोडक्ट्स विभागाचे सीएफए (प्रमुख) अनिल घेलानी म्हणाले,  “दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लवचिकता आणि गुणवत्ता या दोन शक्तिशाली संकल्पना आहेत. या ईटीएफद्वारे, आम्ही गुंतवणूकदारांना असा पर्याय सादर करत आहोत, जो सतत देखरेख किंवा गुंतवणूकीचे हस्तांतरण करण्याची आवश्यकता न पडता शेअरबाजाराच्या विविध टप्प्यांशी स्वयंचलित पध्दतीने जुळवून घेतो. त्याच वेळी, केवळ दर्जेदार कंपन्यांवर लक्ष केंद्रित करत दीर्घकाळ कार्यरत राहणाऱ्या कंपन्यांमध्येच पैसे गुंतविले जातात, हा विश्वास गुंतवणूकदारांना प्रदान करणे, हे या ईटीएफ फंडाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

      डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड्स विभागाचे व्यवसाय प्रमुख गुरजीत कालरा म्हणाले, “भारतीय बाजारपेठेत फ्लेक्सी कॅप धोरणाचा अभाव आहे. बहुतांश विविधांगी फंड किंवा फ्लेक्सीकॅप फंड हे मिड आणि स्मॉल कॅप गटातील समभागांत अतिशय मर्यादित प्रमाणात निधी गुंतवतात. डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ फंडामुळे गुंतवणूकदारांना अखेर एकाच फंडाच्या आधारे लार्ज, मिड आणि स्मॉल समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा, पारदर्शक आणि अल्प खर्चिक मार्ग उपलब्ध झाला आहे. दीर्घ कालावधीत संपत्ती निर्मितीसाठी हा फंड सर्व परिस्थितींमध्ये योग्य पर्याय प्रदान करू शकतो. ”

      अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि माहितीपत्रक जाणून घेण्यासाठी भेट द्या: डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ .

 डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ फंड ही एक मुदतमुक्त श्रेणीतील योजना आहे आणि ती निफ्टी ५०० फ्लेक्सी कॅप क्वालिटी ३० या निर्देशांकाचा मागोवा घेते/वाटचाल करते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गुंतवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मध्यपूर्वेतील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने हस्तक्षेप करावा !

मध्यपूर्वेतील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने हस्तक्षेप करावा ! ‘भाअक’चे रा…