
no images were found
भारतासह चीन आणि नेपाळमध्ये भूकंप
नवी दिल्ली : मंगळवारी ९ नोव्हेंबरच्या रात्री १.५७ मिनिटांनी भारत, चीन आणि नेपाळ येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टर स्केल इतकी नोंद आहे. भारतामधील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांत भूकंपाचे हे धक्के बसले. या ६.३ रिक्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यामुळे नेपाळमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. घर कोसळल्यामुळे या ६ जणांचा मृत्यू झाला असून उत्तराखंडमधील पिथोरागड या ठीकाणी आज (बुधवार) सकाळी ६.२७ मिनिटांनी परत भूकंपाचे धक्का बसले. या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी नोंद झाली असून भारत आणि नेपाळ सीमेच्या जवळ उत्तराखंडमधील पिथोरागड जवळ ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. याचे धक्के पूर्ण उत्तर भारतातही जाणवले. भूकंपाचे केंद्र पिथोरागडपासून ९० किलो मीटर दूर नेपाळमध्ये असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिम्मोलॉजीने स्पष्ट केलेय.
या भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीत नेपाळमध्ये अधिक नुकसान झाल्याचे समजते. डोटी या ठिकाणी भूकंपामुळे घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण मृत्यूमुखी पडले तर ५ जण जखमी झाले आहेत. डोटी येथील भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी नोंद झाली आहे. मृत व्यक्तींमध्ये एकाच घरातील तिघांचा समावेश समावेश असून या घटनेतील जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.