
no images were found
संजय राऊत यांना जामीन मंजूर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. सुमारे 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु ईडीने कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मागील सुनावणी दरम्यान मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊत यांच्या जामीन अर्जावरील आपला निर्णय राखून ठेवलेला होता.
संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आदेश देताना मोठा त्यांना मोठा दिलासा मिळाला. जवळ जवळ १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये संजय राऊत यांना जामीन देण्यात आला आहे. यावरच आज सुनावणी होऊन संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे.