
no images were found
न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश
नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. पुढील २ वर्षांसाठी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहतील. सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रथित नियमानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती. सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ मराठमोळे सरन्यायाधीश आहेत. त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे ७ वर्ष ४ महिने अशा दीर्घ कालावधीसाठी सरन्यायाधीशपदी कार्यरत होते. धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेय. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. आज (९ ऑक्टोबर) रोजी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.