Home राजकीय संजय राऊतांच्या जामीनानंतर शिवसैनिकांचा कोल्हापुरात जल्लोष

संजय राऊतांच्या जामीनानंतर शिवसैनिकांचा कोल्हापुरात जल्लोष

0 second read
0
0
410

no images were found

संजय राऊतांच्या जामीनानंतर शिवसैनिकांचा कोल्हापुरात जल्लोष

कोल्हापूर : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळाल्याचे जाहीर होताच कोल्हापुरात जल्लोष सुरु झाला आहे. टायगर इज बॅक, शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर येणार अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर आल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप केला. विजय देवणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे, सुषमा अंधारे यांनी तुम्हाला सळो की पळो करून सोडलं आहे, आता वाघ तुम्हाला सोडणार नाही. मुरलीधर जाधव यांनी जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला.
संजय पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय राऊत यांच्या हेतूपरस्पर कारवाई करण्यात आली. जे देशभरात घडत आहे ते महाराष्ट्रात घडत आहे. आमच्याविरोधात बोलायचं नाही, तो नियम कुठून काढला आहे? हा हुकूमशाहीला धक्का आहे. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…